नायजेरियातील मशिदीत करण्यात आलेल्या गोळीबारात १२ जण ठार

अबूजा (नायजेरिया) – शहरातील फुंटुआ भागातील मॅगमजी मशिदीमध्ये नमाजपठण चालू असतांना झालेल्या गोळीबारात मशिदीच्या इमामासह (मशिदीमध्ये प्रार्थना करवून घेणारा) १२ जण ठार झाले. या वेळी आक्रमण करणार्‍यांनी काही जणांचे अपहरणही केल्याचे सांगितले जात आहे. आक्रमण करणार्‍यांनी अपहरण केलेल्यांच्या कुटुंबियांकडे खंडणीची मागणी केली आहे. यासमवेतच लोकांना शेतीसाठी अनुमती घेण्यास आणि संरक्षण शुल्क भरण्यास सांगण्यात आले आहे. नायजेरियातील काही टोळ्या लोकांची हत्या करतात किंवा खंडणीसाठी त्यांचे अपहरण करतात. ते लोकांकडून शेतीच्या संरक्षणासाठी पैशांची मागणी करतात.

१. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष महंमदु बुहारी म्हणाले की, द्वेषभावना असलेल्यांनी असे घृणास्पद कृत्य केले आहे. अशा द्वेषी लोकांसमोर देश कधीच झुकणार नाही आणि त्यांच्यावर विजय मिळवून दाखवेल.

२. ओवो शहरातील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये ६ मासांपूर्वी गोळीबार झाला होता. यात ५० हून अधिक लोक ठार झाले होते. अनेक जण घायाळ झाले होते. तसेच एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले होते.