देहली येथे आफताबला ठार मारण्याचा प्रयत्न

नवी देहली – श्रद्धा वालकर हत्येचा आरोपी असणारा प्रियकर आफताब पूनावाला याला २८ नोव्हेंबर या दिवशी त्याला ‘पॉलिग्राफ’ (व्यक्ती खरे बोलतो कि खोटे ?, याची तपासणी करणे) चाचणीनंतर कारागृहात नेत असतांना त्याला तलवारीने ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथे पोलिसांच्या व्हॅनमधून आफताब याला नेण्यात येत होते, तेव्हाही व्हॅन थांबवून आतमध्ये असणार्‍या अफताबला ठार मारण्यासाठी तिघेजण पोचले होते. त्यांच्या हातात तलवारी होत्या.

पोलिसांना त्यांना तात्काळ रोखले आणि कह्यात घेतले. ‘आमच्या बहिणी सुरक्षित नाही, तर आम्ही जिवंत राहून काय उपयोग ? आमच्या बहिणीची हत्या करणार्‍याला आम्ही ठार मारू. तलवारच नाही, तर गोळ्याही घालू’, असे हे आक्रमणकर्ते बोलत होते. त्यांनी ते हिंदु सेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला.