अफगाणिस्तानमधील मदरशात नमाजाच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटात १५ जण ठार !

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या समांगन प्रांतातील ऐबक शहरात जाहदिया मदरशात झालेल्या बाँबस्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण घायाळ झाले. दुपारी नमाजाच्या वेळी हो स्फोट झाला.

घायाळांची संख्या अधिक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बाँबस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 संपादकीय भूमिका

इस्लामी देशात मुसलमानांच्या संघटना एकमेकांनाच मशिदी, मदरसे यांठिकाणी आक्रमणे करून ठार मारतात, हे भारतातील निधर्मीवादी कधी बोलत नाहीत ?