प्रशासकीय कामात माझ्याकडून राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. मी स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न करीन. पोलिसांच्या स्थानांतरामध्ये जे अधिकार दिलेले आहेत, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील.

परमबीर सिंह यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा साक्षात्कार स्थानांतरानंतर का झाला ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. ‘कुणाच्या सांगण्यावरून मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली ?’ हा मूळ विषय आहे. त्याचे अन्वेषण होणार आहे का ?

अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र

न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले.

अन्वेषणातून इतके विषय बाहेर येतील की, राजकारणावरील जनतेचा विश्‍वास उडेल ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

मंत्रीमंडळातील एक मंत्री १५ वर्षे एका महिलेशी संबंध ठेवल्याचे उघडपणे सांगतो, ठेवतो, दुसरा मंत्री २२ वर्षांच्या युवतीसमवेत संबंध ठेवतो, गृहमंत्री १०० कोटी रुपयांची वसुली मागतात हे विषय आतापर्यंत बाहेर पडले आहेत.

पोलिसांच्या स्थानांतरासाठी किती पैसे घेतले हे बाहेर पडेल ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

पोलिसांच्या स्थानांतरामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण झाल्यास यामध्ये किती पैसे घेतले गेले, हे बाहेर पडेल, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.

दळणवळण बंदीच्या शक्यतेमुळे मुंबईतील रेल्वेस्थानकांवर गावाला जाणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ एप्रिल या दिवशी जनतेशी साधलेल्या ‘ऑनलाईन’ संवादामध्ये ‘येत्या २ दिवसांत दळणवळण बंदीविषयी निर्णय घेण्यात येईल’, असे म्हटले होते.

पोलिसांची अल्पसंख्यांक आणि हिंदु यांच्याविषयी रंग पालटणारी धर्मनिरपेक्षता !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

मुंबईत कोरोना लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा पार !

१ मार्चपासून तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण चालू झाले. या अंतर्गत आज लसीकरणाच्या संख्येचा १० लाखांचा टप्पा पार झाला असून आजपर्यंत एकूण १० लाख ८ सहस्र ३२३ इतके लसीकरण करण्यात आले आहे.

ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषित कारखाने 

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक नागरीकरण असलेल्या ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषित कारखाने आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून समोर आली आहे.

प्रभादेवी येथील इलेक्ट्रिक वायरच्या गोदामाला आग

वायरच्या गोदामाचा तळमजला आणि बेसमेंटमध्ये आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.