मुंबई – सत्ताधारी पक्षावर जेव्हा आम्ही आरोप केले, त्या वेळी राजकीय आरोप करत असल्याची टीका आमच्यावर करण्यात आली; मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर आमच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. अनिल देशमुख यांना आम्हाला वैयक्तिक लक्ष्य करायचे नाही. कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. पोलिसांच्या स्थानांतरामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण झाल्यास यामध्ये किती पैसे घेतले गेले, हे बाहेर पडेल, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.