मुंबई – १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा नोंद केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआयने) यापूर्वीच त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा देहलीत नोंद करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. गुन्हा रहित करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.