
मुंबई – मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी अनुमती देण्याच्या अधिवक्त्यांच्या विनंतीचा सध्या विचार करणार नाही. लोकलमध्ये गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने राज्यशासनाने निर्बंध ठेवले आहेत, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने लोकल रेल्वेगाड्यांमधून अधिवक्त्यांना प्रवास करण्याची अनुमती नाकारली आहे. लोकल रेल्वेगाड्यांमधून अधिवक्त्यांना प्रवासाची अनुमती मिळावी, यासाठी एका प्रलंबित याचिकेवर २१ मे या दिवशी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली. यावरील पुढील सुनावणी उन्हाळी सुट्टीनंतर ९ जून या दिवशी ठेवण्यात आली आहे.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट