मुंबईतील कराची बेकरीची शाखा बंद !

७४ वर्षे शत्रूराष्ट्राच्या राजधानीचे नाव देऊन आणि दुकानांच्या अनेक शाखा निर्माण करून मुसलमान पैसे कमावू शकतात, असे केवळ भारतातच होऊ शकते !

मुंबईच्या वीजप्रणालीद्वारे सायबर आक्रमण करणार्‍या चीनला ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !

आपली आक्रमण करण्याची तीव्रता ही चीनहून अधिक हवी. आपल्याकडे असलेल्या क्षमतेचा वापर करून ‘सायबर सर्जिकल स्ट्राईक’ केले पाहिजेत. ज्या स्तरावर चीनने भारतावर आक्रमण केले, त्याच स्तरावर भारतानेही उत्तर द्यायला पाहिजे.

मुंबईत मागील वर्षी वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात !

अमेरिकेतील आस्थापनाचा दावा ! गलवान खोर्‍यातील संघर्षाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न ! भारत सरकारने अमेरिकेच्या वृत्तपत्राने केलेला हा दावा खरा कि खोटा, हे पडताळून त्यामागील सत्य समोर आणणे आवश्यक !

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्‍यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.

मराठी शाळेत शिक्षण घेतल्याने मुंबई महापालिकेने नोकरी नाकारलेल्या १५९ तरुण-तरुणींचे आंदोलन

राज्यभर ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला; पण मराठीबहुल महाराष्ट्रात अशी घटना घडणे लज्जास्पद !

असुरक्षित मुंबई !

काही दिवसांपूर्वी मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवलेली गाडी आढळली होती. त्याविषयी मुंबई, महाराष्ट्रातील सुरक्षायंत्रणांसह राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा अन्वेषण करीत आहेत.

मुंबईत पोलीस खात्यात ५० टक्के उपस्थिती : ‘वर्क फ्रॉम होम’ चालू

मुंबई शहरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस खात्यातील कार्यालयात गट-अ आणि गट-ब संवर्गातील अधिकार्‍यांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्यात येणार आहे; मात्र गट-क आणि ड संवर्गातील कर्मचार्‍यांंची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के राहील,असे आदेश देण्यात आलेले आहेत.

मराठीचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूतांचा गौरव

आरोग्य, शिक्षण क्षेत्रात समाजमाध्यमांद्वारे विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयामधील प्रतिनिधींचा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करणार ! – गृहमंत्री

अनिल देशमुख यांनी सांगितले की, डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अनेकांची नावे आत्महत्या पत्रामध्ये लिहिली आहेत. भाजपचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का ? या सर्व त्रासामुळे डेलकर यांनी आत्महत्या केली का ? याची पडताळणी केली जाईल, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

अस्लम शेख यांनी भेंडीबाजार आणि बेहराम पाडा येथेही मास्क लावण्याचा सल्ला द्यावा ! – संदीप देशपांडे, मनसे

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.