वर्ष २०२५ पर्यंत राज्यात १७ सहस्र ३८५ मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करणार ! – डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री
अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांतून स्वस्त विजेची निर्मिती होत असल्याने येणार्या काळात राज्यात विजेचे दर अल्प होणार आहेत. यामुळे उद्योगवाढीस चालना मिळणार आहे.