उल्हासनगर महापालिकेने ५०५ इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याच्या नोटिसा बजावल्या !

उल्हासनगर येथे वर्ष १९९२ ते १९९८ या कालावधीत रेतीच्या अभावामुळे उलवा रेती आणि दगडाचा बारीक चुरा यांपासून बहुतांश इमारती बांधण्यात आल्या. अशा इमारतींचे सज्जे कोसळून अनेक जणांचे बळी गेले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अटकेला २२ जूनपर्यंत संरक्षण !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना २२ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात येत आहे, अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीने १४ जून या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आली.

औषधांचा पुरेसा पुरवठा केला जात नसल्याविषयी केंद्र सरकारने खुलासा करावा ! – मुंबई उच्च न्यायालय

राज्यात म्युकरमायकोसिसमुळेे दोन दिवसांत ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘औषध वितरणात केंद्र सरकार हात आखडता घेत आहे’, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

म्युकरमायकोसिसची तीव्रता वाढलेल्या ३० टक्के रुग्णांवर उपचार अशक्य !

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनच्या मात्राही पूर्ण आणि वेळेत मिळत नसल्याने ही बुरशी नियंत्रणात आणणे अवघड होते.

गड-किल्ले यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील २५० दुर्गप्रेमींशी संवाद !

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘दुर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडचणींचा पाढा वाचत होतो; पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ?….

अभिनेते रणवीर सिंह यांच्याकडून ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या रंगमंचावर भूत दिसल्याचा दावा !

याविषयी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना काय म्हणायचे आहे ? आता ‘विज्ञानवादी’ कुणाला म्हणायचे  ? या घटनेला ‘अंधश्रद्धा’ ठरवून मोकळे होणार्‍यांना कि या सूक्ष्म शक्तींविषयी संशोधन करून त्यामागील सत्य जाणून घेणार्‍यांना ? हे जनतेला ठाऊक आहे.  

कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रमाणावरून राज्यातील जिल्हानिहाय निर्बंध घोषित !

कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रमाणावरून राज्य सरकारने १४ ते २१ जून या कालावधीसाठी ५ टप्प्यांनुसार जिल्हानिहाय निर्बंध घोषित केले आहेत. यापुढे आता प्रत्येक आठवड्याला अशा प्रकारचे प्रमाण सरकारकडून घोषित करण्यात येणार आहे.

मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी न्यायालयाला उत्तरदायी ठरवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महापौरांना फटकारले

मालाड येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी ‘न्यायालयाचा आदेश असल्याने अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील कारवाई थांबली’, असे वक्तव्य सौ. पेडणेकर यांनी केले होते.

देशात धर्मांधांची वाढती लोकसंख्या हेच अखंड भारताच्या विभाजनाचे मूळ कारण ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायद्यासाठी अभियान आरंभण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !

मुंबईत दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात !

अमली पदार्थ नियंत्रक विभागाने मुंबईमध्ये एका ठिकाणाहून दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. २ किलो २०० ग्रॅम वजनाचे हे अमली पदार्थ आहेत.