
मुंबई – कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे सर्वांसाठी बंद असतांना प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात महनीय व्यक्तींना प्रवेश देण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, तसेच चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक एकता कपूर यांनी मंदिरात दर्शन घेतल्याचे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तामध्ये श्री सिद्धिविनायक मंदिरातील ‘सीसीटीव्हीच्या चित्रणात महनीय व्यक्ती मंदिराच्या गाभार्यात जाऊन दर्शन घेत असल्याचे दिसते.
(सौजन्य: लोकसत्ता)
वृत्तामध्ये श्री सिद्धिविनायक मंदिरातील प्रवेश नोंदणीच्या नोंदवहीचीही माहिती देण्यात आली. यामध्ये काही व्यक्तींना मंदिराच्या मागील दारातून नियमितपणे प्रवेश देण्यात आल्याचे नमूद केले आहे. एकीकडे सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश करण्याला बंदी असतांना प्रसिद्ध व्यक्तींना मात्र मंदिरात प्रवेश देण्यात येत असल्याविषयी जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)