मुंबई महापालिका निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळणार – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई – सत्ताधार्‍यांनी वॉर्ड रचना, प्रभाग रचना किंवा कुठलीही रचना केली, तरी मुंबई किंवा अन्य महापालिका निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळणार आहे. असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत काही प्रभागांची तोडफोड करून त्यांना पाहिजे तसा प्रभाग सिद्ध करण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून चालू आहे. याविषयी आम्ही सजग आहोत. निवडणूक आयोगाला याची माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाने कृती केली नाही, तर न्यायालयात जाऊ.