‘ईडी’ची कारवाई, मराठा आणि ओबीसी आरक्षण, विधान परिषदेत १२ आमदारांच्या नियुक्तीवरून गदारोळ होण्याची शक्यता !

राज्यपालांनी १२ आमदारांची नियुक्ती रोखल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवड टळणार !

सभागृहात संधी दिली नाही, तर जनतेमध्ये जाऊन प्रश्न मांडू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

५ जुलैपासून चालू होत असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका मांडली.

चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे ‘सत्यनारायण की कथा’ या नावाने प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार !

साजिद नाडियाडवाला हे प्रेमकथेवर आधारित चित्रपटाला स्वतःच्या श्रद्धास्थानाचे नाव देण्याचे धाडस दाखवले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यामुळेच ऊठसूठ कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, महापुरुष यांचे विडंबन करतो.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यामी गौतम यांना सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स !

यामी यांना ७ जुलै या दिवशी अन्वेषणासाठी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही सक्तवसुली संचालनालयाने समन्स पाठवला आहे. अनिल देशमुख यांनी बार चालू ठेवण्यासाठी संबंधितांकडून घेतलेले ४ कोटी ७० लाख रुपये ऋषिकेश देशमुख यांना दिले.

अन्वेषण थांबले, तर अन्वेषण करणार्‍यांच्या घरावर मोर्चा काढू ! – राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकर्‍यांचे कारखाने त्यांना परत मिळावेत, हीच आमची मागणी आहे.

मुंबईत भरदिवसा ज्वेलर्स मालकाची हत्या करून दागिन्यांची चोरी

दहिसर येथील गावडे परिसरातील ‘ओम साईराज ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर दिवसाढवळ्या घुसून ३ युवकांनी दागिन्यांची चोरी केली.

दायित्व पार पाडता येत नसेल, तर आम्हाला सांगा !

राज्यात लागू असलेल्या कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असतांना राज्य सरकार काहीच कारवाई का करत नाही ? नियम आणि कायदे यांवर कार्यवाही होत आहे कि नाही ? हे पहाण्याचे दायित्व राज्य सरकारचे आहे.

गुलशन कुमार हत्या प्रकरणी १८ वर्षांनंतर अब्दुल रौफ मर्चंट याची जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाकडून कायम 

अब्दुल रौफ मर्चंट हा दाऊद इब्राहिम याचा साथीदार असून वर्ष २००२ मध्ये गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी  न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती.

मुंब्रा येथे पोलिसावर चाकूने आक्रमण करणारा धर्मांध अटकेत !

आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्यामुळेच धर्मांध कायदा हातात घेण्याचे धाडस करत आहेत, हे लक्षात घ्या !