इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठीच्या तज्ञ समितीचा अहवाल १ मासात द्यावा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना चालू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून १ मासात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.

‘आयटीआय’मध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती या दोन्ही सवलतींचा २५७ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !

‘धर्म पालटला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सवलती ग्राह्य धरल्या जातील का ? याविषयी समितीने सर्वंकष अभ्यास करून उपाययोजना सुचवाव्यात’

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची कारागृहातून सुटका करण्याची मागणी !

या आंदोलनात श्री योग वेदांत सेवा समितीचे मुंबईतील विविध भागांतील एकूण ३५० हून अधिक साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक या वेळी उपस्थित होते. उ.बा.ठा. गटाचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही या वेळी उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नावर त्वरित बैठक घ्यावी !- डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

२८ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नावर त्वरित बैठक घेण्याचे निर्देश दिले.

सागरी मार्ग (कोस्टल रोड) येत्या ८ दिवसांत चालू करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

सागरी मार्गाचा (कोस्टल रोड) बिंदूमाधव चौक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा भाग येत्या ८ दिवसांत चालू करणार, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २९ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत दिली.

‘महादेव बेटिंग ॲप’ प्रकरणी ईडीच्या धाडी !

तरुणांचे आदर्श असणारे कलाकार जुगाराला प्रोत्साहन देणे, देशाचा पैसा बुडवणे आदी किती देशद्रोही गोष्टी करत आहेत, हे लक्षात घ्या !

मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्का वापरल्याची गोष्ट गंभीर ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षर्‍या, शिक्क्याची प्रकरणे होतात, हे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा !’ – आशिष शेलार, आमदार, भाजप

शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन साहाय्य करणार, सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी करणार, अशा घोषणा तत्कालीन आघाडी सरकारने त्यांच्या काळात केल्या, त्याचे काय झाले ? याचे उत्तर आधी द्यावे. मगच आम्हाला प्रश्न विचारावेत, अशी टीका त्यांनी केली विधानसभेत केली.

वारंवार होणार्‍या पेपरफुटीच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याची मागणी !

राज्यात वारंवार होणार्‍या पेपरफुटीच्या प्रकरणी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केले. यामध्ये १० ते १२ आमदार सहभागी झाले होते.

ब्राह्मणांना धमकी दिलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश !

 गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘महाराष्ट्रातील ब्राह्मणांना २० मिनिटांत कापून काढू’ अशी भाषा करणारी व्यक्ती बारामतीशी संबंधित आहे.