मुंबईत ५ वर्षांत विविध प्रकारच्या रस्त्यांचे प्रकल्प उभारणार !

येत्या पाच वर्षांमध्ये मुंबईत रस्त्यांची तब्बल ५८ सहस्र कोटींची कामे केली जाणार आहेत. एम्.एम्.आर्.डी.ए. (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)ने या प्रकल्पाला संमती दिली आहे.

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने गंभीर आजारांचे वेळेपूर्वी निदान !

मुंबई विद्यापिठाने प्रामुख्याने महिलांमधील आणि अन्य गंभीर आजार  यांचे आगाऊ निदान करण्यासाठी काही रुग्णालयांच्या साहाय्याने कृत्रिम बुद्धीमत्ता मॉडेलचा विकास करण्याची योजना हाती घेतली आहे.

२९ सप्टेंबर या दिवशी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’चा तिसरा हप्ता !

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसर्‍या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर या दिवशी होणार आहे. याविषयीची अधिकृत माहिती महिला आणि बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

नौदल अधिकार्‍याची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी ममनचा शोध घेऊन अटकेची कारवाई केली.

Dynamic Young Leader NiteshRane : हिंदूंच्‍या अंगावर आलात, तर तुम्‍हाला शिंगावर घेऊ ! – आमदार नितेश राणे

हिंदूंच्‍या रक्षणासाठी अशी आक्रमक भूमिका घेणारे आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन ! असे नेते सर्वत्र हवेत !

मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा पुनर्विकास होणार !

येथील बहुसंख्य नागरिक हे बाहेरील राज्यातून आलेले आहेत. त्यांचा विकास होऊन त्यांना घरे मिळू शकतात; परंतु कित्येक मराठी माणसांना घरांच्या प्रचंड किमतींमुळे मुंबईबाहेर जावे लागत आहे, हे वास्तव आहे !

२४ ते २९ सप्टेंबर या काळात मुंबईत मुसळधार पाऊस

२७ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्रात येणार !

निवडणूक आयोगाचे पथक २७ सप्टेंबरला राजकीय पक्ष, निवडणूक अधिकारी, निवडणुका राबवणार्‍या यंत्रणा, तसेच पोलीस अधिकारी यांची भेट घेतील, तर २८ सप्टेंबरला दुपारी ४.३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.

१.५८ कोटी रुपयांचे २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त !

अशा प्रकारे प्रतिदिन तस्करी करणार्‍यांना अटक केल्याची वृत्ते येतात; पण त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, हेही उघड व्हायला हवे, तरच अशा प्रकारांना आळा बसेल !

महापे (नवी मुंबई) येथे बनावट नोटा छापणार्‍या दोघांना अटक

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! या दोघांसमवेत आणखी कुणाचा सहभाग आहे ? याचीही चौकशी पोलिसांनी करावी !