ओणी अणुस्कुरा रस्त्याच्या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद ! – सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण

‘रस्ता तातडीने होणे आवश्यक होते; परंतु निधीअभावी या रस्त्याचे काम रखडले होते. येणार्‍या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.’

खासदार संजय राऊत यांच्‍यावर हक्‍कभंगाच्‍या कारवाईसाठी विधानसभा अध्‍यक्षांकडून १५ सदस्‍यीय समितीची निवड केली जाणार !

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला ‘विधीमंडळ नाही, तर चोर मंडळ’ म्‍हटल्‍याचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले होते.

मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ येथील शिवलिंगाला भेसळयुक्त पदार्थांच्या अभिषेकामुळे भेग !

कोरोना काळापासून मंदिरात दुग्धाभिषेक बंद करण्यात आला आहे. गेल्या ८ ते १० मासांपासून रसायनयुक्त पदार्थांसह विधी केल्याने शिवलिंग खराब होत आहे, असे मंदिरातील पुजार्‍यांच्या लक्षात आले.

विजयदुर्ग गडाजवळील आरमार गोदी अधिग्रहित करून शासनाने विकास करावा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

विजयदुर्ग गडाच्या परिसरातील आरमार गोदीची जागा अधिग्रहित करून शासनाने या ऐतिहासिक ठेव्याचा विकास करावा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे केली आहे.

सोलापूर येथे पैलवानांकडून मोठ्या प्रमाणात उत्तेजक द्रव्यांचा वापर !

सोलापूर येथे आखाड्यांतील पैलवान उत्तेजनासाठी ‘मेफेन्टरमाईन सल्फेट’ या ‘इंजेक्शन’चा मोठ्या प्रमाणात अवैधपणे वापर करत असल्याची धक्कादायक माहिती अन्न आणि औषध विभागाकडून विधानसभेत देण्यात आली.

मुंबईतील पत्रकार परिषदेतील मान्‍यवरांचे विचार !

राज्‍यातील ३५ महत्त्वाच्‍या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे त्‍वरित हटवा ! – श्री. सुनील घनवट

खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याविषयी भाजपने संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत केलेल्या हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. याविषयी २ दिवसांत चौकशी सभागृहात निर्णय देऊ, अशी घोषणा अध्यक्षांनी केली.

संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांचा गदारोळ !

संजय राऊत सत्ताधार्‍यांविषयी म्हणाले, ही बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नव्हे, हे चोरमंडळ आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याच्या मागणीवरून विधानसभेचे कामकाज ३ वेळा तहकूब !

खासदार संजय राऊत यांनी ‘विधीमंडळ चोरमंडळ आहे’, या केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली.

सर्वोच्‍च न्‍यायालयात पहिल्‍या दिवसाचा युक्‍तीवाद संपला !

आजच्‍या पहिल्‍याच दिवशी कपिल सिब्‍बल यांनी ‘पक्षातून फुटून बाहेर पडलेल्‍या आमदारांसमोर अपात्रतेच्‍या कारवाईतून वाचण्‍यासाठी विलिनीकरण हाच एकमेव मार्ग आहे’, असे सांगितले.