देशातील सर्वाधिक कुष्‍ठरोगी महाराष्‍ट्रात !

कुष्‍ठरोगींना अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र देणे आणि त्‍यांना नोकर्‍या उपलब्‍ध करून देणे, यांविषयी सर्वंकष धोरण निश्‍चित करण्‍यासाठी संबंधित तज्ञ अन् अधिकारी यांची समिती नेमण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली.

कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि नोकर्‍या देण्याविषयी शासन समिती गठीत करणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणे आणि त्यांना नोकर्‍या उपलब्ध करून देणे याविषयी सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी संबंधित तज्ञ आणि अधिकारी यांची समिती गठीत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली.

राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मलनि:स्सारण प्रक्रिया चालू करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नाल्याचे पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी बांधकाम, तसेच अन्य उद्योगांसाठी करावे, असा आदेश औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आला आहे. पाण्याचा पुनर्वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ‘भविष्यात नद्यांचे प्रदूषण अल्प होईल.’

भिडेवाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठी न्यायालयात मागणी करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी भिडेवाडा येथे स्मारक करण्याविषयी तेथील जागेचे मालक, विकासक आणि भाडेकरू यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. न्यायालयीन दाव्यांमुळे या जागेचे भूसंपादन प्रलंबित असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतरही कांद्याच्या खरेदीवरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ !

मुख्यमंत्री उत्तर देत असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ‘शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे कि राजकारण करायचे आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधक जागेवर बसले.

गळ्यात कांदा-लसूण यांच्या माळा घालून विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

कांदा, लसूण, कापूस यांना भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत विरोधकांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. गळ्यात कांदा-लसूण यांच्या माळा घालत विरोधकांनी सरकारचा धिक्कार केला.

समृद्धी महामार्गावरील ठिकाणांची नावे मराठीत द्यावीत ! – आमदार अजय चौधरी

मराठी भाषाभवनाचे भूमीपूजन होऊनही अद्याप कामाला प्रारंभ झालेले नाही. समृद्धी महामार्गावरील ठिकाणांची नावे हिंदी आणि इंग्रजी यांमध्ये आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

कोकणातील मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पावसाळ्याच्या आरंभीच म्हणजे जूनमध्ये या बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे.

‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या स्‍फूर्तीगीताने महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळ अधिवेशनाला प्रारंभ !

‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या गीताला राज्‍यगीताचा दर्जा मिळाल्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळाच्‍या दोन्‍ही सभागृहांत प्रथमच हे गीत वाजवण्‍यात आले. ‘वन्‍दे मातरम्’ आणि त्‍यानंतर ‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या गीताने विधीमंडळाच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला.

दुरवस्‍था झालेल्‍या बसगाडीवर गतीमान शासनाचे विज्ञापन असलेले छायाचित्र समाजमाध्‍यमांतून प्रसारित

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या भूम (जिल्‍हा धाराशिव) येथील आगारातील काचा नसलेल्‍या एका बसगाडीचे छायाचित्र सध्‍या मोठ्या प्रमाणात समाजमाध्‍यमांतून प्रसारित होत आहे. या बसगाडीत एक वृद्ध आणि लहान मुलगा खिडकीत बसले आहेत; मात्र खिडक्‍यांना काचाच नाहीत. तसेच बसचा पत्राही तुटला आहे.