अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी नवीन धोरण आणणार ! – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची संख्या वाढवणे, तसेच कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर देण्यात येईल. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असणार्‍या अधिकार्‍यांना पालटण्याचाही निर्णय घेण्यात येईल.

घाऊक बाजारातील भाजीपाल्याच्या दरात घसरण !

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारातील भाजीपालाच्या दरात घसरण झाली आहे. आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर न्यून झालेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.

महामंडलेश्‍वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचा देहत्याग !

५ मार्चला दुपारी ४ वाजता सातारा येथील जावळी तालुक्यातील कापसेवाडी येथे त्यांचा समाधी सोहळा होईल. प.पू. महाराज हे श्री पंच दशनाम जुना आखाडा परिषदेमध्ये सक्रीय होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा शिष्य परिवार आहे.

इयत्ता १२ वीच्या ‘गणित’ विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही ! – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ

या विषयाची प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेले नाही. याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत. त्यामुळे ‘गणित’ या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.

राज्यात श्वान दत्तक योजना चालू करणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, पशूसंवर्धन मंत्री  

महाराष्ट्रातील विविध शहरे आणि ग्रामीण भाग येथे एकूण १२ लाख भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. या भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक शहरांत भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणांत वाहनधारकांचा अपघात होऊन काही लोक घायाळ झाले आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदानस्थळ आणि समाधीस्थळ यांच्या विकास आराखड्याच्या नावात अंशत: पालट ! – देवेंद्र फडणवीस

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलीदानस्थळ, मौजे तुळापूर (तालुका हवेली) आणि समाधीस्थळ स्मारक, वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

गड-दुर्गांच्या रक्षणासाठी मुंबईत महामोर्च्याद्वारे शासनाला आर्त साद !

छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, मागण्यांचे फलक यांसह मावळ्यांच्या वेशात महामोर्च्यात सहभागी झालेल्या गड-दुर्गप्रेमींनी गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला आर्त साद घातली !

गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्यशासनाकडून मान्य !

पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी स्वत: आझाद मैदानात येऊन गड-दुर्ग रक्षण समितीच्या मागण्या समजून घेतल्या. या वेळी समयमर्यादा निश्‍चित करून राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे जतन आणि सवंर्धन यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्‍वासन श्री. मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले.

हिंदवी स्‍वराज्‍याचे शिलेदार ठरलेल्‍या गडदुर्गांची दु:स्‍थिती !

मुंबईच्‍या दक्षिण बाजूच्‍या टोकावर असलेल्‍या वांद्रेगडाची अर्ध्‍याहून अधिक तटबंदी ढासळली आहे. तटबंदीची वेळीच डागडुजी न झाल्‍यास गडाची सर्वच तटबंदी पडण्‍याची शक्‍यता आहे.

वारीशे यांच्या घातपाताविषयी सखोल चौकशी करण्याविषयी आमदार डॉ. राजन साळवी यांनी मांडली लक्षवेधी सूचना

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही मार्गाने मांडलेल्या भूमिके संदर्भात पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या गुन्हेगारांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.