माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे आणि निलंबन रहित !

महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. ‘निलंबनाचा कालावधी ‘ऑन ड्युटी’ (कामावर उपस्थित) असल्याचे मानले जावे’, असे आदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता !

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बाहेर पडलेल्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रता यांविषयी येत्या २ दिवसांत सर्वाेच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय ११ मे या दिवशी देऊ, असे स्‍पष्‍ट केले आहे.

महाराष्ट्रातील २० खेळाडू जर्मनीमध्ये जाऊन घेणार ‘फूटबॉल’चे प्रशिक्षण !

जर्मनीतील पायाभूत सुविधा, क्रीडा संकुल व्यवस्थापन, खेळाडूंची निवड, अत्याधुनिक प्रशिक्षण, क्रीडा विज्ञानाचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडाक्षेत्रात पायाभूत सुविधांची निर्मिती, अत्याधुनिक प्रशिक्षण, क्रीडासंकुलांचे व्यवस्थापन आदींचा अभ्यास या दौर्‍यामध्ये केला जाणार आहे.

मुंबईचे माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचे निधन

अंत्ययात्रेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही शिवसैनिक उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून महाडेश्‍वर यांची प्रकृती ठीक नव्हती. ते मूळचे सिंधुदुर्ग येथील होते.

नागरी क्षेत्र विकासाच्या नावाखाली सरकारी निधीतून अल्पसंख्यांकांच्या धार्मिकस्थळांचा विकास !

अल्पसंख्यांकबहुल क्षेत्रात मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेच्या अंतर्गत राज्यशासनाने वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अल्पसंख्यांकबहुल भागात नागरी सुविधा देण्यासाठी या निधीचा उपयोग करावा, असे या योजनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

‘द केरल स्टोरी’ला विरोध करणे चुकीचे ! – अभिनेत्री शबाना आझमी

नुकताच प्रदर्शित झालेला ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्वीट करून व्यक्त केले.

मी हात जोडून विनंती करतो, ‘द केरल स्टोरी’ बघा ! – अभिनेते शरद पोंक्षे

मी हात जोडून सगळे पालक आणि स्त्रिया यांना विनंती करतो की, एकदातरी ‘द केरल स्टोरी’ बघा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.

मुंबई येथे मुसलमानाकडून फसवल्याविषयी हिंदु युवतीची तक्रार

फेसबूक’वर संदेश पाठवून आसिफ नावाच्या मुसलमान युवकाने मुंबईतील एका युवतीशी जवळीक निर्माण केली आणि लैंगिक संबंध प्रस्थापित केले; पण नंतर त्याने युवतीशी विवाह करण्यास नकार दिल्यामुळे तिने वडाळा येथील टी.टी. पोलीस ठाण्यात आसिफ याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.

परशुराम घाटातील वाहतूक ११ मेपासून नियमित चालू होण्याची शक्यता !

मुंबई-गोवा महामार्गावर भरावाचे काम पूर्ण होऊन त्यानंतर काँक्रिटीकरणास प्रारंभ केला जाणार आहे. या मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाल्याने ११ मेपासून या घाटातील वाहतूक नियमित चालू होईल

निधन वार्ता

दहिसर (मुंबई) – येथील साधक सुधाकर नाईक-साटम (वय ९० वर्षे) यांचे ५ मे या दिवशी दुपारी २.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार नाईक-साटम परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.