मी हात जोडून विनंती करतो, ‘द केरल स्टोरी’ बघा ! – अभिनेते शरद पोंक्षे

शरद पोंक्षे

मुंबई – ‘द केरल स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही. चित्रपटातील दृश्ये सतत डोळ्यांपुढे येत होती. भारतातील प्रत्येकाने हा चित्रपट पहायला हवा. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत आहेत. मी हात जोडून सगळे पालक आणि स्त्रिया यांना विनंती करतो की, एकदातरी ‘द केरल स्टोरी’ बघा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘हा चित्रपट पाहून मनात अनेक प्रश्न उद्भवतात. आपल्या संस्कृतीविषयी अनभिज्ञ असल्याचा लाभ उठवत जिहादी आपला बुद्धीभेद (ब्रेनवॉश) करण्यात यशस्वी होत आहेत, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करून निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मोठे धारिष्ट्य दाखवले आहे.’’

हिंदू बहुसंख्य असेपर्यंत देशात ‘सेक्युलरिझम’ असेल आणि हिंदू अल्पसंख्यांक होताच देशाचे इस्लामीकरण होईल !

या वेळी अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, ‘‘जिहादच्या नावावर जे काही चालू आहे, यापासून सावध व्हा. अद्यापही वेळ गेलेली नाही. जोपर्यंत या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, तोवर या देशात ‘सेक्युलरिझम’ (धर्मनिरपेक्षता) टिकून राहील. ज्या दिवशी हिंदू अल्पसंख्यांक होतील, तेव्हा या देशाचे इस्लामीकरण करण्यात येईल, याविषयी माझ्या मनात काहीही शंका नाही.’’