भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

कणकवली येथे संतोष परब यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाले होते. या प्रकरणी आमदार राणे आणि गोट्या सावंत यांच्या जामीनअर्जावर २८ आणि २९ डिसेंबर असे दोन दिवस सुनावणी झाली; मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय स्‍मारकाचे काम न्‍यायालयीन प्रक्रियेमुळे रखडले !

मुंबईलगत असलेल्‍या अरबी समुद्रात उभारण्‍यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय स्‍मारकाचे काम न्‍यायालयीन प्रक्रियेमुळे रखडले आहे. न्‍यायालयाने स्‍मारकाच्‍या बांधकामाला स्‍थगिती दिली आहे.

पुणे येथील मायलेकींच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी न्याय !

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पीडित महिलेच्या आत्महत्येनंतर २९ वर्षांनी आरोपी पतीला दोषी ठरवून ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे. 

पुणे येथील मायलेकींच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी मिळाला न्याय !

विलंबाने न्याय मिळाल्यास संबंधिताला अन्याय झाल्यासारखे वाटू शकते !

गोव्यात रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावण्यावरील बंदीआदेशाचे कठोरतेने पालन करण्याचे उच्च न्यायालयाचे प्रशासन आणि पोलीस यांना निर्देश

असे न्यायालयाने सांगावे लागणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! बंदीआदेश असतांना ध्वनीक्षेपक लावले जात असल्याचे पोलिसांच्या का लक्षात येत नाही ?

आमदार बाबूश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी मंत्री जेनिफर यांचे आरोपपत्र रहित करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणीचा खटला १३ वर्षांनंतर न्यायालयात चालत असेल, तर सामान्य नागरिकांना कधी न्याय मिळत असेल ? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

परस्पर संमतीने बर्‍याच कालावधीसाठी शारीरिक संबंध ठेवून लग्नाला नकार दिल्यास त्याला फसवणूक म्हणता येणार नाही !

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल !

कुपोषणाच्या संदर्भात कृती आराखडा सिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश !

या वर्षी नोव्हेंबरपर्यंत मेळघाटात अनुमाने ४०० मुलांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची माहिती याचिकाकर्ते बंडू साने यांनी या वेळी उच्च न्यायालयात दिली.

सी.बी.आय. विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंद प्रकरण

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयात विनाअट क्षमायाचना !

अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका केल्याचे प्रकरण