कृष्णनीती वापरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘मी प्रयत्न करीन, मगच देव माझ्या मागे उभा राहील’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत. अत्याचारांच्या विरोधात स्वतः आवाज उठवा. अधर्माच्या नाशासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेईलच; परंतु त्यासाठी स्वतः धर्मावरील आघातांच्या विरोधात उभे रहा.

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी रत्नागिरीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ! – विनोद गादीकर, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे सरकारीकरण, लव्ह जिहाद, हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूवर होणार्‍या नित्य आघातांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

कर्नाटकातही ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ लवकरात लवकर करण्यात यावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

निपाणी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ४ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार !

राष्ट्र आणि धर्म कार्यात अग्रक्रमाने सहभागी होण्याचा हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी-उद्योजक यांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाड्ये यांच्या प्रबोधनामुळे राष्ट्र आणि धर्म कार्यात अग्रक्रमाने सहभागी होण्याचा, तसेच ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या संदर्भात व्यापक प्रबोधन करण्याचा हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी-उद्योजक यांनी निर्धार व्यक्त केला.

देशाला अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्‍या ‘हलाल जिहाद’ला सर्व स्तरांवर विरोध करा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर आव्हान उभे करणार्‍या ‘हलाल जिहाद’च्या व्यवस्थेला सर्व स्तरांवर वैध मार्गांनी विरोध करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.

‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी प्रयत्नरत रहाणे आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हे व्याख्यान ऐकल्यावर ‘समाजातील लोकांचे व्यापक प्रमाणात प्रबोधन होण्यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करूया’, असे उपस्थित सर्वांनी सांगितले.

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या विश्‍वव्यापक कार्यात सहभागी व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

भगवंताच्या कृपेमुळे राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे अनेक आघात रोखण्यात समितीला यश मिळाले आहे. समितीच्या वतीने देवतांचे विडंबन, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, मंदिर सरकारीकरण, धर्मांतर या धर्मावरील आघातांच्या विरोधात व्यापक जनप्रबोधन करण्यात आले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडये यांचा ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात सांगली जिल्हा जागृती दौरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात देशव्यापी जागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात तालुका स्तरावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. त्याचा वृत्तांत . . .

हिंदूंनी ‘हलाल’चा शिक्का असलेली उत्पादने घेणार नाही, असा निग्रह करायला हवा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

‘राष्ट्र आणि धर्म’ प्रसाराचे ‘सनातन प्रभात’चे कार्य कौतुकास्पद !  – पू. भिडेगुरुजी

‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! – प्रा. उमाकांत होनराव

राजकारण्यांनी समाजाला जातीत विभागले. त्यामुळे धर्मांधांची शक्ती वाढत आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे.