कर्नाटकातही ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ लवकरात लवकर करण्यात यावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

निपाणी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ४ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार !

दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु स्वाती खाडये, मध्यभागी श्री. मनोज खाडये आणि अधिवक्ता नीलेश सांगोलकर

निपाणी (कर्नाटक) – ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या २३ वर्षीय रूपाली चंदनशिवे हिची तिचा पती इक्बाल महंमद शेख याने भरदिवसा गळा चिरून हत्या केली, तर आफताब नावाच्या धर्मांधाने त्याच्यासोबत ‘लिव्ह इन’मध्ये रहाणार्‍या श्रद्धा वालकर नावाच्या हिंदु युवतीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणांची वाढत चाललेली गंभीरता पहाता अनेक राज्यांत झालेल्या कायद्याप्रमाणे कर्नाटकातही ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ लवकरात लवकर करण्यात यावा. ‘वक्फ कायद्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्तीही सहज बळकावता येते. हा भारतात चालू असलेला सर्वांत मोठा ‘लँड जिहाद’ असून हा काळा कायदा रहित करण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवायला हवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. २७ नोव्हेंबर या दिवशी म्युनिसिपल हायस्कूल मैदान, जुना बी.पी. रोड येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या सभेसाठी ४ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते.

______________________________________ 

सभेसाठी उपस्थित धर्मप्रेमी हिंदू

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनीही उपस्थितांना संबोधित केले. प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमूर्ती उदय यर्नाळकर यांनी वेदमंत्रपठण केले. समितीच्या कार्याचा आढावा समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी मांडला.

श्री. मनोज खाडये

श्री. मनोज खाडे या वेळी म्हणाले

१. याच मैदानावर काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदु धर्माविषयी अपशब्द वापरून हिंदु धर्माचा अर्थ ‘घाणेरडा’ असे सांगितले होते. काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपशब्द बोलत आहेत. या संदर्भात विरोध झाल्यावर क्षमा मागण्याचे नाटक केले जाते. यापुढील काळात त्यांनी आता क्षमा नाही, तर अशांना आता लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्युत्तर देऊन कायमस्वरूप घरी बसवले पाहिजे.

२. ‘वक्फ कायदा’ रहित करण्यासाठी कर्नाटक सरकारच्या वक्फ, हज आणि धर्मादाय मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांना निवेदन देऊन हा काळा कायदा कायमस्वरूपी रहित करावा, अशी मागणी केली पाहिजे.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करूया ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

भारतीय घटनेत समानतेचे तत्त्व असतांना अल्पसंख्यांकांना संरक्षण आणि बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष होत आहे. शासकीय अनुदानातून हिंदू सोडून अन्य धर्मियांना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्यास, मदरसे स्थापन करण्यास अन् कॉन्व्हेंट शाळा चालू करण्यास मान्यता आहे. त्यामुळे संविधानाद्वारेच केला जाणारा हा अन्याय दूर करण्यासाठी हिंदूंनी सर्वसमावेशक अशा हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन सद्गुरु स्वाती खाडये यांनी या प्रसंगी केले.

सभेसाठी उपस्थित धर्मप्रेमी हिंदू

हिंदूंना लढा देण्यासाठी अधिवक्त्यांचे प्रभावी संघटन उभे करावे लागेल ! –  अधिवक्ता नीलेश सांगोलकर

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

राज्यघटनेत गोवधास बंदी असूनही आज संपूर्ण भारतात गोहत्याबंदी कायदा का होऊ शकत नाही ? गोरक्षा करणार्‍या हिंदू तरुणांवरच गुन्हे प्रविष्ट केले जातात. अवैध कत्तलखाने अनेक ठिकाणी चालवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषणाच्या संदर्भात आदेश असूनही भोंग्यांद्वारे होणारे ध्वनीप्रदुषण चालूच आहे. या संदर्भात कुठेही कारवाई होताना दिसत नाही. याचा अर्थ अल्पसंख्याकांना फायदे आणि हिंदूंना कायदे अशी स्थिती झालेली आहे. या विरोधात आता हिंदूंना कायदेशीर लढा देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. त्याकरीता अधिवक्त्यांचे प्रभावी संघटन करून त्यांची साहाय्यता घ्यावी लागेल.

सभेसाठी उपस्थित धर्मप्रेमी हिंदू

क्षणचित्रे

१. ग्रामीण भागातून युवक आणि युवती यांची उपस्थिती लक्षणीय होती. हमीदवाडा, चिखली, कापशी, मुरगुड, यमगर्णी, लिंगनूर, गळतगा, जत्राट, अक्कोळ यांसह अन्य गावांमधून युवक उपस्थित होते.

२. सभेनंतर धर्माभिमानी हिंदूंसाठी पुढील कृती करण्यासाठी २ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता वाल्मिकी हॉल, मराठा मंडळ सांस्कृतिक भवनच्या मागे, निपाणी या ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


हे पहा –

____________________________ 

आपल्या मार्गदर्शनात श्री. मनोज खाडये म्हणाले,

१. निपाणी आणि परिसरात जे विभाग, गल्ली, तसेच हिंदूंची श्रद्धास्थाने-ऐतिहासिक वास्तू यांचे इस्लामीकरण करण्यात आले आहे आणि किंवा ते करण्याचा घाट घातला जात आहे. येणार्‍या काळात आम्ही ते कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. यासाठी येणार्‍या काळात हिंदु जनजागृती समिती आंदोलन उभे करेल.

२. ‘जो हिंदू हित का कार्य करेगा वही देश पर राज करेगा’, अशी घोषणा आता आपल्याला द्यावी लागेल.

सभेसाठी उपस्थित धर्मप्रेमी हिंदू

निपाणी येथील समाधी मठाचे पू. प्राणलिंग स्वामीजी, पू. ओशोजी, पू. प्रभुलिंग स्वामीजी यांनी सभास्थळी भेट दिली.

उपस्थित वारकरी महाराज –  ह.भ.प. नवनाथ घाटगे, जत्राट येथील ह.भ.प. श्रीधर महाराज

प्रतिष्ठित – निपाणी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. नीता बागडे, स्थायी समिती सभापती श्री. राजू गुंदेशा, देवचंद महाविद्यालयाचे प्राचार्य पी.पी. शहा, भाजपचे शहराध्यक्ष श्री. प्रणव मानवी, उद्योजक श्री. चंद्रकांत कोठीवाले, विश्व हिंदु परिषदेचे श्री. राजू पुरंत, सुचित्रा कुलकर्णी, इस्कॉनचे श्री. अनिल खांडके यांसह अन्य उपस्थित होते.

क्षणचित्र : धन्वन्तरी आयुर्वेदिक महाविद्यालय श्रीपेवाडी येथील ४० युवतींना घेऊन तेथील शिक्षिका आल्या होत्या.


सभास्थळी ग्रंथप्रदर्शन पहातांना १. कर्नाटक सरकारच्या वक्फ, हज आणि धर्मादाय मंत्री सौ. शशिकला जोल्ले

सभेच्या प्रारंभी कर्नाटक सरकारच्या वक्फ, हज आणि धर्मादाय मंत्री सौ. शशिकला जोल्ले, निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. जयवंत भाटले यांनीही सभेच्या प्रारंभी सभास्थळी येऊन सदिच्छा भेट दिली. ‘हिंदु जनजागृती समिती पुष्कळ चांगले करत असून या कार्याची आवश्यकता आहे. आपण महिलांसाठी लवकरच असा एक कार्यक्रम आयोजित करू’’, असे मंत्री सौ. शशिकला जोल्ले या प्रसंगी म्हणाल्या.