राष्ट्र आणि धर्म कार्यात अग्रक्रमाने सहभागी होण्याचा हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी-उद्योजक यांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडये यांचा सांगली जिल्हा दौरा !

सांगली – हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाड्ये यांचा सांगली जिल्ह्यात राष्ट्र अन् धर्म जागृती दौरा पार पडला. यात ठिकठिकाणी व्यापारी, उद्योजक, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका, वैयक्तिक संपर्क यांद्वारे प्रबोधन करण्यात आले. या प्रबोधनामुळे राष्ट्र आणि धर्म कार्यात अग्रक्रमाने सहभागी होण्याचा, तसेच ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या संदर्भात व्यापक प्रबोधन करण्याचा हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी-उद्योजक यांनी निर्धार व्यक्त केला.

म्हैशाळ येथे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये
म्हैशाळ येथील मार्गदर्शनासाठी उपस्थित धर्मप्रेमी हिंदू

१. मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने झालेल्या मार्गदर्शनासाठी २०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. ‘आजपर्यंत आम्ही असे मार्गदर्शन ऐकले नाही’, असे अभिप्राय अनेकांनी व्यक्त केले.

मिरज येथील रंगशारदा सभागृहात मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये
मिरज येथील रंगशारदा सभागृहात मार्गदर्शनासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि अधिवक्ता

२. मिरज येथील रंगशारदा सभागृहात मार्गदर्शनासाठी भाजपचे श्री. जयगोंड कोरे, शिवसेना शिंदे गटाचे महापालिका उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, व्यापारी सेनेचे श्री. पंडित (तात्या) कराडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विनायक माईणकर, सर्वश्री दिगंबर कोरे, संभाजी कोरे, प्रसाद दरवंदर, विनायक कुलकर्णी, बाळासाहेब विभूते यांसह ‘इस्कॉन’, ‘जीवन विद्या मिशन’चे साधक उपस्थित होते.

आटपाडी येथे हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी यांना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये
आटपाडी येथे मार्गदर्शनासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी

३. आटपाडी येथे चौंडेश्वरी मंदिरात ‘हलाल जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या संदर्भात जागृती करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित व्यापारी, उद्योजक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी हा विषय प्रत्येकापर्यंत पोचवून हिंदूंमध्ये जागृती करण्याचा निश्चय केला.

सांगली येथे अधिवक्ता अमोघवर्ष खेमलापुरे यांच्या कार्यालयात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये

४. सांगली येथे अधिवक्ता अमोघवर्ष खेमलापुरे यांच्या कार्यालयात श्री. मनोज खाडये यांनी ‘हलाल जिहाद’वर मार्गदर्शन केले. या प्रसंगी ‘सेवाध्यास फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. अमेय फाळके, ‘अल्ट्राटेक सिमेंट’चे वितरक श्री. विनायक ठोंबरे, ‘साथीदार युथ फाऊंडेशन’चे कार्यवाह श्री. ऋतुराज सूर्यवंशी, कालिकादेवी मंदिराचे विश्वस्त श्री. गणेश सुतार, ‘योगी कार्पाेरेशन’चे श्री. स्मित शहा आणि अधिवक्ता इंद्रजीत शिंदे उपस्थित होते. मार्गदर्शन ऐकल्यावर ‘या विषयाची दाहकता किती आहे ? याची जाणीव झाली. या पुढील काळात इतरांचे प्रबोधन करू’, असे सर्वांनी सांगितले.

ईश्वरपूर येथे मार्गदर्शनासाठी उपस्थित उद्योजक-व्यापारी

५. ईश्वरपूर येथे पाटीदार समाजाचे अध्यक्ष श्री. किरीट पटेल, तसेच उद्योजक सर्वश्री जिग्नेश पटेल, ईश्वरभाई पटेल, दीपक पटेल यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शनात श्री. मनोज खाडये यांनी ‘उद्योजकतेकडे साधनेच्या दृष्टीकोनातून कसे पहायचे ? पुढच्या टप्प्याची साधना कशी करायची ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

पलूस येथे हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी यांना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये
पलूस येथे मार्गदर्शनासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी
तासगाव येथे हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये
तासगाव येथे मार्गदर्शनासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

६. तासगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. येथे तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.

विशेष

शरद पोंक्षे

म्हैशाळ येथे झालेल्या मार्गदर्शनात श्री. मनोज खाडये म्हणाले, ‘‘पिंक रिव्हॉल्यूशन म्हणजे भारत देशातून परदेशात निर्यात केले जात असलेले गोमांस आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हे आतंकवाद पोसण्यासाठी वापरले जाते. प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे म्हणतात, ‘एक बर्गर किंवा पिझ्झा विकत घेणे म्हणजे आतंकवादास प्रोत्साहन होय. त्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या प्रत्येक वस्तूवर आपल्याला बहिष्कारच टाकला पाहिजे.’’