देशाला अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्‍या ‘हलाल जिहाद’ला सर्व स्तरांवर विरोध करा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ‘विवेक सभे’ अंतर्गत विशेष व्याख्यान !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्थिती

धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये

सांगली – भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ आणि वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी विविध आस्थापनांना ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ घेणे अनिवार्य केले जाऊ लागले आहे. याद्वारे धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’, म्हणजे ‘हलाल इकॉनॉमी’ अतिशय धूर्तपणे निधर्मी भारतात लागू करण्यात आली आहे. ‘हलाल’च्या माध्यमातून गोळा होणारा पैसा आतंकवाद्यांचे खटले लढवण्यासाठी वापरला जातो. तरी भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर आव्हान उभे करणार्‍या ‘हलाल जिहाद’च्या व्यवस्थेला सर्व स्तरांवर वैध मार्गांनी विरोध करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.

मार्गदर्शन संपल्यावर पू. भिडेगुरुजी यांच्या समवेत चर्चा करतांना श्री. मनोज खाडये

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘विवेक सभे’च्या अंतर्गत १३ नोव्हेंबरला सिटी हायस्कूल येथे रात्री ७ वाजता ‘हलाल प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरप्रमुख श्री. अविनाशबापू सावंत यांनी केले. धारकरी श्री. अमित करमुसे यांनी श्री. मनोज खाडये यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. या प्रसंगी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले,

१. एकीकडे मुसलमान धर्मियांच्या प्रार्थनास्थळात सेवा करणार्‍या मुल्ला-मौलवींना, तसेच अन्य लोकांना मासिक ६ ते १८ सहस्र रुपये इतके पैसे देण्यात येतात, तर दुसरीकडे सिंदुधुर्ग जिल्ह्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराची देखभाल करणार्‍या पुजार्‍याला २५० रुपये इतकी तुटपुंजी रक्कम देण्यात येते.

२. काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड कायद्या’त केलेल्या सुधारणेमुळे हिंदु, ख्रिस्ती, शीख, बौद्ध आणि अन्य मुसलमानेतरांची कुठलीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचा अत्यंत भयानक अधिकार वक्फ बोर्डाला मिळाला आहे. परिणामी भारत सरकारच्या रेल्वे आणि संरक्षण दल यांच्यानंतर वक्फ बोर्डाकडे देशातील सर्वाधिक, म्हणजे ८ लाख एकरहून अधिक भूमी आहे. तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील तिरुचेथुरई हे संपूर्ण गावच वक्फ बोर्डाची संपत्ती घोषित झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. ही धोक्याची घंटा असून हिंदूंनी जागृत व्हायला हवे.

३. जी आस्थापने त्यांची उत्पादने परदेशात निर्यात करत नाहीत, ती आस्थापनेही मुसलमान ग्राहकांनी त्यांची उत्पादने खरेदी करावीत, यासाठी ‘हलाल’ प्रमाणपत्र घेत आहेत. त्यांतील अनेक आस्थापनांचे मालक हिंदु आहेत, हे दुर्दैवी आहे.

४. हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालणे, हलाल व्यवस्था बंद होण्यासाठी पंतप्रधानांना पत्र पाठवणे यांसह वैयक्तिक, तसेच संघटनात्मक पातळीवर याला विरोध होणे आवश्यक आहे.

५. महाराष्ट्र शासनाने प्रतापगडावरील अतिक्रमण हटवले आहे; मात्र राज्यातील बहुतांश गड असे आहेत, ज्यांवर इस्लामिक अतिक्रमण आहे आणि मंदिरे-समाधी यांची दुरवस्था आहे. त्यामुळे यापुढील काळात आपल्याला हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार करायचे असेल, तर प्रतिदिन राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.

‘स्लाईड्स’च्या माध्यमातून उपस्थित धारकऱ्याना मार्गदर्शन करताना श्री. मनोज खाडये

क्षणचित्रे

१. व्याख्यान चालू असतांना ‘हलाल’ विषयाच्या संदर्भात समितीला मिळालेल्या यशाविषयी सांगतांना उपस्थित धारकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे ‘हर हर महादेव’च्या घोषणा दिल्या.

२. व्याख्यान चालू असतांना ‘प्रोजेक्टर’वर (मोठ्या पडद्यावर) ‘स्लाईड्स’ दाखवण्यात आल्यामुळे विषय समजणे सोपे झाले.

३. व्याख्यान संपल्यावर अनेक धारकर्‍यांनी श्री. मनोज खाडये यांना भेटून ‘व्याख्यान आवडले’, असे सांगितले, तर काहींनी शंकानिरसनही करून घेतले.

४. कार्यक्रमस्थळी विक्रीसाठी ठेवलेल्या ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाला उत्तम प्रतिसाद लाभला.

प्रतिक्रिया

व्याख्यान ऐकल्यानंतर काहींनी ‘या व्याख्यानामुळे आम्हाला नेमकेपणाने विषय समजला. यातून आम्हाला प्रेरणा मिळाली’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर काहींनी ‘आम्ही १५ ते २० जणांचा गट करून त्यांच्यापर्यंत हा विषय पोचवू’, असे सांगितले.