१. घरी बनवलेल्या तेलात पुष्कळ नकारात्मक स्पंदने, तर सनातन केश तेलात पुष्कळ सकारात्मक स्पंदने असणे
‘घरी बनवलेले केश तेल आणि ‘सनातन केश तेल’ यांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांतून लक्षात आले की, घरी बनवलेल्या केश तेलामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नसून ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात होत्या आणि त्यांच्या प्रभावळी अनुक्रमे १०.०१ मीटर आणि ६.८७ मीटर होत्या. सनातन केश तेलामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती अन् तिची प्रभावळ ११.५८ मीटर होती. यातून घरी बनवलेले केश तेल वापरणे हानीकारक, तर सनातन केश तेल वापरणे अत्यंत लाभदायी असल्याचे लक्षात आले.
२. मनाची एकाग्रता आणि उत्साह वाढण्यास साहाय्य करणारे सात्त्विक ‘सनातन केश तेल’ !
अ. सनातन केश तेलामध्ये आध्यात्मिक आणि नैसर्गिक घटकांचा वापर केला आहे. यांमध्ये माका, कापूर, आवळा, नागरमोथा, हिना, मेथीचे दाणे, तीळ, खोबरेल तेल यांचा समावेश आहे. या घटकांचा गंध कोणत्या ना कोणत्या देवतेचे तत्त्व आकर्षित करून घेणारा असल्याने ईश्वरी चैतन्य मिळण्याचे प्रमाण अधिक आहे.
आ. सनातन केश तेलाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. सनातन केश तेलामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती अन् तिची प्रभावळ ११.५८ मीटर होती.
इ. सनातन केश तेल निर्भेळ (शुद्ध) स्वरूपात आणि सात्त्विक आहे. एखाद्याच्या मनात पुष्कळ विचार येत असल्यास, मन एकाग्र होत नसल्यास, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा अशांत वाटत असल्यास आध्यात्मिक लाभ करून देणारे अन् सत्त्वप्रधान स्पंदने आकृष्ट झालेले हे तेल लावल्यामुळे साधकाचे मन स्थिरावते किंवा प्रसन्न होते. हे तेल केसांच्या मुळांशी लावल्यामुळे तेथे असणारी अनिष्ट शक्तीची स्थाने नष्ट होतात, तसेच मन प्रसन्न रहाण्यासह मनाची एकाग्रता आणि उत्साह वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे दैनंदिन कार्ये आणि साधना चांगली होण्यास साहाय्य होते.
ई. सनातन केश तेलाचे वितरण करणारे साधक आहेत आणि त्यांच्यात सेवाभाव आहे. त्यामुळे या तेलात पुष्कळ सात्त्विकता आहे.’
– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
|