सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीची माहिती घोषित करा ! – मनसेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

माहिती अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील महसूल विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन येथील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड झाली; मात्र त्याचे पुढे काय होते, हे समजत नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने चौकशी दडपली जाते.

परप्रांतियांच्या नोंदी ठेवण्यासाठी मनसे २२ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत निवेदन देणार

अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरकारने मंदिरे लवकर उघडली नाहीत, तर मंदिराबाहेर घंटानाद करू ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे म्हणाले, ‘‘सरकारला जनआशीर्वाद यात्रा चालते; पण सण साजरे करायला बंदी घातली आहे. कोरोना काय केवळ सणांमध्ये पसरतो का ? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का ?

ठाणे येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसेने आंदोलन केल्याप्रकरणी १७ जणांना अटक !

दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने नौपाडा येथील भगवती मैदानावर मनसेने अनुमती नसतांनाही व्यासपीठ बांधण्यास प्रारंभ केला.

विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी ग्रामपंचायत रणदेवीवाडी आणि कसबा सांगाव अशा ३५ जणांचे ठराव प्रशासनास सादर ! 

दोन्ही ग्रामपंचायतींतील विविध सहकारी संस्था, तसेच तरुण मंडळे यांचा उत्स्फूर्त सहभाग ! विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, यासाठी भगवंतेश्वर मंदिरात मनसेच्या वतीने अभिषेक !

सिंधुदुर्गच्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा

जिल्ह्यातील अवैध खनिज उत्खनन, सिलिका उत्खनन प्रकल्प, बेसुमार वृक्षतोड आदींना पाठीशी घालणार्‍या भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी ‘अप्पर जिल्हाधिकारी हटवा-पर्यावरण वाचवा’ अशा घोषणा देत मनसेच्या वतीने धडक मोर्चा

‘श्रीमंत’ नाव लावल्याने श्रीमंत होता येत नाही. विचाराने, कृतीने श्रीमंत’ असावे लागते ! – रूपाली पाटील-ठोंबरे, महिला शहराध्यक्ष, मनसे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि मनसे यांच्यात शाब्दिक चकमक चालू आहे.

मनसेचे गजानन काळे यांना लवकरच अटक करणार ! – पोलीस आयुक्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांच्यावर टीका करणार्‍या संभाजी ब्रिगेडला मनसेची चेतावणी !

संभाजी ब्रिगेडच्या वक्तव्याला किंमत देऊ नये

मनसेचे गजानन काळे यांच्याविरुद्धची छळवणुकीची तक्रार मागे घेण्यासाठी पोलिसांचा दबाव !

गजानन काळे यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक अत्याचार कायदा या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे; मात्र तीन दिवस उलटूनही काळे यांच्यावर कारवाई होत नसल्याचे संजीवनी काळे यांनी सांगितले.