मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकार्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. त्यानंतर बिपीन कुमार सिंग यांनी त्यांना वरील आश्वासन दिले आहे.