Amit Shah : निवडणूक रोख्यांना दुसरा पर्याय नसल्याने आताच्या निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर होत आहे ! – अमित शहा यांचा दावा

असे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्याच्या प्रश्‍नावर दिले.

Loksabha Election 2024 : तमिळनाडूत आतापर्यंत १ सहस्र ३०९ कोटी रुपयांची रोकड आणि सोने जप्त !

तेलंगाणात २०२ कोटी रुपयांचा माल जप्त

Loksabha Eledctions 2024 : गोवा – टपालाद्वारे करण्यात येणार्‍या मतदानाच्या पहिल्या दिवशी ८५ वर्षांवरील १ सहस्र ५८४ मतदारांनी हक्क बजावला !

टपालाद्वारे करण्यात येणारी मतदान प्रक्रिया ३ मेपर्यंत चालणार आहे. विशेष सेवेसाठी नेमण्यात आलेल्या ८ सहस्र ९४३ मतदारांपैकी २ सहस्र २४१ मतदार ३ ते ५ मे या कालावधीत त्यांना नेमून दिलेल्या केंद्रांमधून टपालाद्वारे मतदान करणार आहेत.

Loksabha Elections 2024 : कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण !

कुडाळ येथे टपाली मतदानासाठी एकूण ७८५ अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कुडाळ येथील मतदान केंद्रावर टपाली मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.

उत्तर पश्चिम (वायव्य) येथील महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना !

उत्तर-पश्चिम (वायव्य) येथून लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना देण्यात आली आहे. शिवसेनेच्या ‘एक्स’ खात्यावर वायकर यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन

लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे या दिवशी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीसदलाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी संचलन करण्यात आले. 

चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात २९८ उमेदवार रिंगणात !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे या दिवशी  ११ मतदारसंघात होणार आहे. या सर्व मतदारसंघांत मिळून एकूण २९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Narendra Modi In Pune : मोदी आतंकवाद्यांना घरात घुसून मारणार !

मुंबई आणि पुणे येथे रक्तस्त्राव झाला होता; पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले आहे.

मुंबईत मतदान केंद्रांवर आरोग्य, तसेच थंड पाण्याची सुविधा

मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ‘आपला दवाखाना’, तसेच आरोग्य केंद्र आणि चिकित्सालये येथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरमधून ‘एम्.आय.एम्.’ची उमेदवारी रहित !

एम्.आय.एम्.’चा उमेदवार असल्यास भाजपचा लाभ होतो, म्हणून मुसलमान समाजातूनच या उमेदवारीला विरोध झाल्याचे सांगण्यात येते. अशरफी सध्या भ्रमणभाष उचलत नाहीत, असे समजते.