मुंबईत मतदान केंद्रांवर आरोग्य, तसेच थंड पाण्याची सुविधा

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरवण्याचे दायित्व निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ‘आपला दवाखाना’, तसेच आरोग्य केंद्र आणि चिकित्सालये येथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच थंड पाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबईत मतदानाच्या वेळी मतदान केंद्रांवर येणार्‍या नागरिकांना उष्माघात किंवा अन्य त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुंबईत चालू करण्यात आलले ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हेसुद्धा मतदान केंद्रांशी जोडण्यात येणार आहेत.