Loksabha Elections 2024 : कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण !

कुडाळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रावर कार्यरत असणार आहेत, असे अधिकारी अन् कर्मचारी यांची टपाली मतदान प्रक्रिया २९ आणि ३० एप्रिल या दिवशी ४ केंद्रांद्वारे पूर्ण करण्यात आली. कुडाळ येथे टपाली मतदानासाठी एकूण ७८५ अर्ज प्राप्त झाले होते.

जिल्हाधिकारी किशोर तावडे

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कुडाळ येथील मतदान केंद्रावर टपाली मतदान करून मतदानाचा हक्क बजावला. या वेळी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील कर्मचार्‍यांना दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीविषयीचे प्रशिक्षण कुडाळ येथील सिद्धिविनायक सभागृहात देण्यात आले. प्रशिक्षणाच्या अंतर्गत मतदान यंत्र हाताळणी, मतदान यंत्र ‘सिल’ करणे, बोगस मतदान टाळणे, मतदान केंद्रात निर्माण झालेल्या अडचणींचे सुलभपणे निरसन करणे यांसह मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक सर्व सूत्रांची माहिती देण्यात आली. अंतिम टप्प्यातील प्रशिक्षण निवडणुकीच्या आधी २ दिवस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात ७ मे या दिवशी मतदान होणार आहे.