मुंबईमध्ये अपंग आणि ज्येष्ठ यांना मतदानासाठी विनामूल्य वाहनाची सुविधा !

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई दक्षिण आणि दक्षिण-मध्य या मतदारसंघांत २० मे या दिवशी मतदान होणार आहे. या मतदानासाठी अपंग आणि ज्येष्ठ नागरिक यांना मतदानाला ने-आण करण्यासाठी प्रशासनाकडून..

काँग्रेसीकरणामुळे भारताची ५ दशके वाया गेली ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतासमवेत स्वातंत्र्य झालेले कितीतरी देश पुढे गेले. भारतीय कुठेही अल्प नव्हते; मात्र काँग्रेसने भारतियांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्लानुसार काँग्रेस विसर्जित केली असती, तर भारत ५ पट पुढे गेला असता.

सांगली लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणार्‍यांचा विधानसभा निवडणुकीत बेरंग करू ! – संजयकाका पाटील, खासदार

लोकसभा निवडणुकीत काहींनी शब्द देऊनही पाळला नाही. काहीजण बरोबर असल्याचे भासवत होते; मात्र त्यांनी विरोधात काम केले. त्यांची सर्व माहिती माझ्याकडे आहे. मी रडीचा डाव खेळणार नाही. मी लढणारा माणूस आहे.

देशात ‘एन्.डी.ए.’ला चांगले वातावरण असून ४०० पेक्षा अधिक जागांवर यश मिळेल ! – चंद्राबाबू नायडू

श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन आनंद झाला. देशात शांती नांदावी, या देशातील सर्वांना श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली.

मतदान करणार्‍यांना उपाहारगृहांमध्ये जेवणाच्या दरात २० टक्के सवलत !

मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण दाखवल्यावर मुंबईतील १०० हून अधिक उपाहारगृहांमध्ये जेवणाच्या दरात २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. २० आणि २१ मे हे २ दिवस ही सवलत देण्यात येणार आहे.

योग्य उमेदवार निवडून आणण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होण्याची आवश्यकता !

खरे म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाला खरी स्वायत्तता आणि स्वातंत्र्य देण्याविषयीचे प्रावधान (तरतूद) हवे होते. त्यामध्ये ‘निवडणूक आयोगाच्या धोरणाची त्वरित आणि योग्य पद्धतीने निर्णयांची कार्यवाही करणे, आदेश देणे अन् सूचना देणे यांसाठी निवडणूक आयोगाच्या हाताखाली विशेष विभाग असावा’, असे प्रावधान राज्यघटनेत हवे.

मी तुमच्याकडे विकसित भारतासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘सप्तश्रृंगीमाता आणि नाशिक येथील प्रभु रामचंद्र यांना मी नमन करतो. तुमची सेवा हेच माझे सर्वांत मोठे लक्ष्य आहे. गेल्या १० वर्षांत तुम्ही माझे काम पाहिले आहे.

पुणे, शिरूर येथील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची ३ वेळा तपासणी !

पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे या दिवशी मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी सर्वाधिक प्रचार खर्च शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे.

Himanta Biswa Sarma : भाजपला ४०० जागा मिळाल्या, तर ज्ञानवापी आणि श्रीकृष्णजन्मभूमी येथे मंदिरे बांधली जातील !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरम यांचे विधान

लोकसभेचे मतदान चालू असतांनाच ‘शहरात बाँबस्फोट घडवणार’, असा नियंत्रण कक्षाला खोटा दूरभाष !

संबंधितावर कठोर कारवाई केल्यास असा गैरप्रकार करण्यास कुणी धजावणार नाही !