मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई दक्षिण आणि दक्षिण-मध्य या मतदारसंघांत २० मे या दिवशी मतदान होणार आहे. या मतदानासाठी अपंग आणि ज्येष्ठ नागरिक यांना मतदानाला ने-आण करण्यासाठी प्रशासनाकडून वाहनाची विनामूल्य सुविधा देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदारसंघात प्रशासनाकडून दिव्यांग समन्वय अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या समन्वय अधिकार्यांचे संपर्क क्रमांकही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ८५ आणि त्याहून अधिक वर्षे वय असलेल्या ज्येष्ठांसाठी प्रशासनाकडून वाहनाची सुविधा ठेवण्यात आली आहे.