Himanta Biswa Sarma : भाजपला ४०० जागा मिळाल्या, तर ज्ञानवापी आणि श्रीकृष्णजन्मभूमी येथे मंदिरे बांधली जातील !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे विधान

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

नवी देहली – गेल्या निवडणुकीत आम्ही सांगितले होते की, श्रीराममंदिर बनवायचे आहे आणि या वेळी निवडणुकीत आम्ही सांगत आहोत की, श्रीराममंदिर बांधले आहे. आमच्याकडे ३०० जागा होत्या, तेव्हा आम्ही श्रीराममंदिर बांधले.

यंदाच्या निवडणुकीत जर आम्हाला ४०० जागा मिळाल्या, तर मथुरेमध्ये श्रीकृष्णाचे जन्मस्थान असेल आणि ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्‍वनाथ यांचे भव्य मंदिर बांधण्यात येईल. यासह पाकव्याप्त काश्मीर भारतात परत येईल, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे एका प्रचारसभेत केले.