मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्‍न सोडवा ! – जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे जयदत्त क्षीरसागर यांची मागणी

पश्‍चिमवाहिनी नद्यांचे १४५ टी.एम्.सी. पाणी गोदावरीत सोडा !

बीड – मराठवाडा हा सिंचनाविषयी मागास राहिला आहे, तसेच सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे पश्‍चिमवाहिनी नद्यांचे १३५ टी.एम्.सी. पाणी मराठवाड्याकडे आणि गोदावरी नदीच्या पात्रात वळवावे. यामध्ये अभ्यासगट स्थापन केला असून जलदगतीने काम चालू करा. यांसाठी मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

मुंबई येथे झालेल्या बैठकीत मराठवाड्याच्या सिंचनाचा प्रश्‍न सोडवावा, तसेच शिरूर तालुक्यातील डिसल्याची वाडी येथील साठवण तलावास मंजुरी देण्यात यावी अशीही मागणी केली. या वेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची वरिष्ठ पातळीवर सचिवस्तर आणि विभागीय अधिकारी यांना याविषयी सूचना केल्या, तसेच याविषयी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक पावले उचलेल, असे आश्‍वासन दिले.