(म्हणे) ‘आम्ही धर्म आणि देव यांच्या विरोधात नाही, त्या आधारे फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात आहोत !’ – डॉ. हमीद दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर हे वर्ष १९९० पासून ‘अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायदा’ करण्यासाठी लढत राहिले.

गोव्यातील ५ ते १७ वर्षे वयोगटातील ६६.६ टक्के मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ आढळल्या ! – ‘पीडियाट्रिक सिरो सर्व्हे’चा अहवाल

गोव्यातील ५ ते १७ वर्षे वयोगटातील ६६.६ टक्के मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ आढळल्या आहेत. आरोग्य खात्याच्या ‘इंटीग्रेटेड डिसीझीस सर्व्हेलन्स’ कार्यक्रमांतर्गत ‘पीडियाट्रिक सिरो’ सर्वेक्षणात हे आढळून आले.

पिंपरी येथील लसीकरण केंद्रात महिलेची हुल्लडबाजी !

नेहरूनगर येथील लसीकरण केंद्रात महिलेने चाकू घेऊन प्रवेश करत लसीकरण करणार्‍या आशा सेविकेला खुर्चीने मारहाण केली, तसेच आरोपी महिलेने सेल्फी पॉइंटचीही तोडफोड केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर ‘ए.सी.बी.’ची धाड !

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा १८ ऑगस्ट या दिवशी पार पडली. नंतर सायंकाळी ५ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. या वेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

‘श्रीमंत’ नाव लावल्याने श्रीमंत होता येत नाही. विचाराने, कृतीने श्रीमंत’ असावे लागते ! – रूपाली पाटील-ठोंबरे, महिला शहराध्यक्ष, मनसे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि मनसे यांच्यात शाब्दिक चकमक चालू आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क कपात !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्कात कपात केली असून कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सातारा-कोल्हापूर पॅसेंजर गाडी चालू करण्याची प्रवाशांची मागणी !

पॅसेंजर गाड्यांविषयी अद्याप कोणताही निर्णय आला नसल्यामुळे त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित गाड्या चालू करण्याचे आदेश मिळताच त्या चालू करण्यात येतील.

जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ यांनी मान्य केलेले ईश्वराचे अस्तित्व अन् दाभोलकरी हेकटपणा !

काही वर्षांपूर्वी स्वत:ला पुरोगामी, बुद्धीवादी वगैरे म्हणवणे फार सोपे होते.

शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या साम्यवादी नेत्यांच्याविरोधात शासनाने फौजदारी खटले प्रविष्ट करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.

कर्नाटकातील मठ आणि मंदिरे यांमध्ये अग्निहोत्र करण्याचा आदेश देऊ !

कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील मठ-मंदिरात अग्निहोत्र करण्यात यावे, असा आदेश देण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.