कोल्‍हापूर येथे २६ ते २९ जानेवारी या काळात पश्‍चिम महाराष्‍ट्रातील सर्वात मोठे आणि भव्‍य ‘भीमा कृषी’ प्रदर्शन  ! – धनंजय महाडिक, खासदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ साठी आंतरराष्‍ट्रीय म्‍हणून वर्ष घोषित केलेल्‍या तृणधान्‍यासाठी स्‍वतंत्र दालन

पेठवडगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरी पार पडली !

२२ जानेवारी या दिवशी वडगाव येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा आयोजित करण्‍यात आली आहे. त्या निमित्ताने २० जानेवारीला वाहनफेरी काढण्‍यात आली. या फेरीसाठी ६५ दुचाकी आणि १३० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

पठाण चित्रपट गडहिंग्‍लज (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे प्रदर्शित झाल्‍यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करू ! – काशिनाथ गडकरी, शिवसेना

‘पठाण’ चित्रपटातील एका गाण्‍यात अभिनेत्रीला भगव्‍या रंगाच्‍या तोकड्या पोशाखात दाखवले आहे. यातून हिंदूंसाठी पवित्र अशा भगव्‍याचा अपमान झाला आहे.

कुणीही ‘नायलॉन मांजा’ (दोरा) विक्रीसाठी ठेवल्‍यास कायदेशीर कारवाई ! – पोलीस निरीक्षक, स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण, कोल्‍हापूर

पतंग उडवतांना नायलॉन मांजाचा वापर केल्‍याने ‘सामान्‍य नागरिकांच्‍या जीवितास धोका उत्‍पन्‍न होतो, तसेच पशू-पक्षी घायाळ होतात. पतंगासाठी नायलॉज मांजाची विक्री न करण्‍याविषयी उच्‍च न्‍यायालय आणि शासन यांनी निर्देश दिले आहेत.

देशभक्‍ती, धर्मभक्‍ती, मातृभूमी यांविषयी अपार निष्‍ठा निर्माण होण्‍यासाठी प्रत्‍येकाने गडकोट मोहिमेसाठी आलेच पाहिजे !

धारातीर्थ यात्रेनिमित्त कोल्‍हापूर येथे पू. संभाजीराव भिडेगुरूजींचे मार्गदर्शन ! प्रत्‍येकाने दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचलेच पाहिजे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सिद्धगिरी मठ (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ७ दिवस भव्‍य आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सव ! – चंद्रकांत पाटील, उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ७ दिवस भव्‍य आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सव आयोजित करण्‍यात आला आहे. या उत्‍सवासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य असून त्‍यासाठीच्‍या प्रशासकीय बैठका चालू आहेत.

कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीला साकडे

श्री महालक्ष्मीदेवीला नारळ अर्पण करून, तिची ओटी भरण्यात आली, तसेच देवीला साकडे घालण्यात आले. या प्रसंगी ‘आई श्री महालक्ष्मीदेवीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ द्यावे’, अशी प्रार्थनाही करण्यात आली.

‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे अध्‍यक्ष सूरज ढोली यांचे निधन !

‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे अध्‍यक्ष सूरज ढोली यांचे १२ जानेवारीला हृदयविकाराने निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्‍यांच्‍या मावळ्‍यांची परंपरा म्‍हणजेच शिवकालीन युद्धकला भारतातील मराठी बांधव, युवा पिढी यांना माहिती व्‍हावी, त्‍यांनी ती अवगत करावी, या उद्देशाने शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच कार्यरत होता.

‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाच्‍या माध्‍यमातून लोकांपर्यंत माहिती पोचवण्‍याचा प्रयत्न ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल जिहाद’च्‍या संकटाची माहिती हिंदूंना  होण्‍यासाठी, तसेच त्‍या संदर्भात जागृती करण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाच्‍या माध्‍यमातून कोणती उत्‍पादने हलाल प्रमाणित आहेत, ते समजण्‍यास आपल्‍याला साहाय्‍य होईल.

१५ जानेवारीला ‘सिद्धगिरी हॉस्पिटल’ येथे अत्याधुनिक ‘एम्.आर्.आय.’ आणि ‘कॅथ-लॅब’चा लोकार्पण सोहळा ! – डॉ. शिवशंकर मरजक्के, रुग्णालयाचे संचालक

‘‘आता ही सेवा रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार इतरत्र असणार्‍या सध्याच्या प्रास्ताविक दरापेक्षा ४० टक्के अल्प दरात आणि २४ घंटे उपलब्ध !’’