‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाच्‍या माध्‍यमातून लोकांपर्यंत माहिती पोचवण्‍याचा प्रयत्न ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनंतर आढावा बैठकीत कृती करण्‍याचा निर्धार !

सभेनंतरच्‍या आढावा बैठकीत प्रश्‍न विचारतांना जिज्ञासू

गडहिंग्‍लज (जिल्‍ह कोल्‍हापूर) – ‘हलाल जिहाद’च्‍या संकटाची माहिती हिंदूंना  होण्‍यासाठी, तसेच त्‍या संदर्भात जागृती करण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाच्‍या माध्‍यमातून कोणती उत्‍पादने हलाल प्रमाणित आहेत, ते समजण्‍यास आपल्‍याला साहाय्‍य होईल. मंदिरांचे सरकारीकरण, त्‍यांचे सुव्‍यवस्‍थापन या संदर्भात लवकरच समितीच्‍या वतीने राज्‍यव्‍यापी मंदिर अधिवेशनाचे आयोजन करण्‍यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्‍ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्‍याचे समन्‍वयक श्री. मनोज खाडये यांनी दिली. ते हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनंतर १० जानेवारी या दिवशी आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. या बैठकीत उपस्‍थित विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ, धर्मप्रेमी यांनी कृती करण्‍याचा निर्धार व्‍यक्‍त केला.

ही सभा ‘फेसबुक’वर ‘लाईव्‍ह’ करण्‍यात आली होती. २ सहस्र ५०० लोकांनी ही सभा प्रत्‍यक्ष पाहिली, तर २ सहस्र ५०० लोकांपर्यंत ही सभा पोचली.

विशेष

  • सभेच्‍या ठिकाणी नागरिकांच्‍या प्रबोधनासाठी ‘आण्‍णासाहेब गळतगे लायन्‍स ब्‍लॅड बँक’ यांच्‍या वतीने विशेष कक्ष उभारण्‍यात आला होता. याद्वारे लोकांना रक्‍तदानाचे महत्त्व सांगण्‍यात आले.
  • श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी (मार्गे श्रीवरसुबाई) अशी होत आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन आपल्‍या मार्गदर्शनात श्री. मनोज खाडये यांनी सभेच्‍या कालावधीत केले.
  • सभेच्‍या दिवशी रात्री पुष्‍कळ प्रमाणात थंडी असतांनाही जिज्ञासू वक्‍त्‍यांचे मार्गदर्शन ऐकण्‍यासाठी शेवटपर्यंत थांबून होते.
गडहिंग्‍लज येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या ठिकाणी आण्‍णासाहेब गळतगे लायन्‍स ब्‍लॅड बँक यांच्‍या वतीने उभारण्‍यात आलेला कक्ष