कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीला साकडे

श्री महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मीदेवीला साकडे घालतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १४ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ फेब्रुवारीला पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे. ही सभा निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जानेवारीला श्री महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मीदेवीला नारळ अर्पण करून, तिची ओटी भरण्यात आली, तसेच देवीला साकडे घालण्यात आले. या प्रसंगी ‘आई श्री महालक्ष्मीदेवीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ द्यावे’, अशी प्रार्थनाही करण्यात आली. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती.

या वेळी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. दीपक रेडेकर, उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, उंचगाव येथील उपसरपंच श्री. विराग करी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री शरद माळी, कैलास जाधव, सागर नाकट, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हापप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. मधुकर नाझरे, श्री. अमोल कुलकर्णी, सनातन संस्थेच्या डॉ. शिल्पा कोठावळे, सौ. वैष्णवी साळोखे, सौ. मेघा जोशी यांसह अन्य उपस्थित होते.

संपादकीय भूमिका 

आई श्री महालक्ष्मीदेवी, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ दे !