श्री महालक्ष्मीदेवीच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाणार आहे.
कोल्हापूर – नवरात्रीच्या निमित्ताने जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरून येणार्या भाविकांसाठी ‘के.एम्.टी.’च्या ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवेस ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. यावर्षी या सेवेसाठी वातानुकूलित बस देण्यात येणार असून ही सेवा ११ ऑक्टोबरपर्यंत चालू रहाणार आहे. याचा शुभारंभ २ ऑक्टोबरपासून शाहू मैदान पास वितरण केंद्र येथे होणार आहे. या सेवेसाठी प्रौढांना १८५ रुपये, ३ ते १२ या वयोगटासाठी ९५ रुपये असा दर असणार आहे. प्रतिदिन सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत बससेवेचे आगाऊ आरक्षण पास वितरित करण्यात येतील.
या यात्रेत श्री लक्ष्मीदेवी, श्री एकवीरादेवी, श्री त्र्यंबोलीदेवी, श्री उजळंबादेवी, श्री मुक्तांबिकादेवी, श्री पद्मावतीदेवी, श्री रेणुकादेवी, श्री कात्यायनीदेवी, श्री प्रत्यंगिरीदेवी, श्री कमलजादेवी, श्री महाकालीदेवी, श्री अनुगामिनीदेवी, श्री गजेंद्रलक्ष्मीदेवी, श्री महालक्ष्मीदेवी, श्री तुळजाभवानीदेवी या देवींचे दर्शन घडवण्यात येणार आहे. या बससेवेला ३ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता, तर ४ ऑक्टोबरपासून सकाळी ९, १०, १०.३०, ११ आणि दुपारी १२ वाजता प्रारंभ होईल. या यात्रेचा कालावधी ४ घंटे ५० मिनिटे असून भाविकांना प्रत्येक ठिकाणी १० ते २० मिनिटे दर्शनासाठी मिळतील. ही बस शाहू मैदान नियंत्रण केंद्र येथून सुटेल आणि श्री शाहू मैदान येथे अंतिमत: परत येईल.
आज श्री महालक्ष्मीदेवीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन !नवरात्रीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराची स्वच्छता चालू असून २८ ऑक्टोबर या दिवशी गाभार्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील मुख्य मूर्तीचे दर्शन बंद रहाणार असून भाविकांना दर्शनासाठी उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार आहे. २८ आणि २९ ऑक्टोबरला |