पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक माध्यमांद्वारे मोहीम !

नाईकवाडे यांनी देवस्थान समितीमधील काही अनियमित गोष्टींवर चाप लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे स्थानांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

१ फेब्रुवारीला सूर्याची किरणे श्री महालक्ष्मीदेवीच्या कमरेपर्यंत पोचली !

यंदाच्या वर्षी सूर्यकिरणांची तीव्रता चांगल्या प्रकारे असल्याने किरणोत्सव चांगल्याप्रकारे होत आहे.

३१ जानेवारीला सूर्याची किरणे श्री महालक्ष्मीदेवीच्या किरिटापर्यंत पोचली !

देवीचे मुखकमल उजळून देवीच्या किरिटाच्या वरपर्यंत हे सूर्यकिरण पोचले. त्यामुळे या वर्षातील उत्तरायणातील किरणोत्सव पूर्णक्षमतेने झाला.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील अर्पण पेटीत भाविकांकडून १ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक अर्पण !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन सिमतीने श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील १२ अर्पण पेट्यांमधील अर्पणाची मोजणी पूर्ण केली असून त्यातून एकूण १ कोटी ६० लाख ६४ सहस्र ६४३ रुपये अर्पण मिळाले आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

डॉ. सावंत यांनी नंतर श्री जोतिबा देव आणि नृसिंहवाडी येथे श्री दत्तगुरूंचे दर्शनही घेतले.

मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामासलवकरचपुन्हा प्रारंभ ! – शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेले मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास लवकरच पुन्हा प्रारंभ करण्यात येणार आहे. खोदकामाचे पूर्वीचे दर आणि आताचे दर यांत फरक असून आता नवीन दर ठरवून ते काम करावे लागेल.

श्री महालक्ष्मी मंदिरातील झुंबरांसमोरील अडथळे दूर केल्याने दगडी झुंबर उजेडात !

श्री महालक्ष्मी मंदिरातील काही भागांत दगडी झुंबरांच्या समोर अडथळे असल्याने ती दिसत नव्हती. हे लोखंडी अडथळे दूर करून झुंबरे दिसण्यासाठी तिथे प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे ऐतिहासिक दगडी झुंबरे उजेडात आली आहेत !

देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्याकडून कार्यभार काढला !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पूरग्रस्त महिलांना वाटलेल्या २६ लाख ३२ सहस्र रुपयांच्या ५ सहस्र साड्यांच्या नोंदी समितीकडे नसल्याचे नुकतेच समोर आले. असे प्रकार टाळण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्याच कह्यात हवे !

दुसर्‍या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीच्या कमरेपर्यंत सूर्यकिरणे !

श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव !