कोल्हापूर, १० डिसेंबर (वार्ता.) – श्री महालक्ष्मी मंदिरात आतील काही भागांत दगडी झुंबरे आहेत. या झुंबरांच्या समोर पूर्वीपासून काही अडथळे असल्याने ती दृष्टीक्षेपात येत नव्हती.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी एका आस्थापनेच्या साहाय्याने झुंबराच्या बाहेरील लोखंडी अडथळे दूर केले, तसेच परिसर स्वच्छ केला असून झुंबरे दिसण्यासाठी तिथे प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे ऐतिहासिक दगडी झुंबरे उजेडात येण्यास साहाय्य झाले आहे.