वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याविषयी हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.

पाकने काश्मीरवरील अवैध नियंत्रण सोडावे ! – भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकला सुनावले

केवळ असे सुनावून पाक काश्मीरवरील नियंत्रण सोडणार नाही, तर त्याच्याशी युद्ध करूनच त्याने गिळंकृत केलेले भूभाग परत मिळवावे लागणार आहेत, हीच वस्तूस्थिती आहे !

(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेमध्ये काश्मीरच्या लोकांना समर्थन देत राहू !’ – ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामी कोऑपरेशन (ओ.आय.सी.)

पाकिस्तानच्या दबावातून अशा प्रकारचे विधान करून ‘ओ.आय.सी.’ केवळ पाकला खुश करण्यापलीकडे काहीही साध्य करू शकत नाही; कारण काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे कुणी कितीही बाता मारल्या, तरी त्यात पालट होऊ शकणार नाही, हे ‘ओ.आय.सी.’सारख्या संघटनांनी लक्षात ठेवावे !

काश्मीरची स्थिती पालटण्यासाठी बिहारींकडे काश्मीरचे दायित्व द्या ! – माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची मागणी

गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये परप्रांतियांवर आक्रमणे होत असून बिहारच्या २ कामगारांना ठार मारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मांझी यांनी हे विधान केले.

अशा देशद्रोह्यांना कठोर शिक्षा करा !

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदु आणि शीख नागरिकांची आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यानंतर ९०० हून अधिक स्थानिक धर्मांध नागरिकांना कह्यात घेण्यात आले आहे. ‘आतंकवाद्यांप्रती सहानुभूती दाखवली’, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आतंकवादमुक्त भारत केव्हा ?

आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकचे नाव कुप्रसिद्ध आहेच; मात्र त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती रोखण्यासाठी चर्चा, परिषदा यांद्वारे चेतावण्या देण्याच्या पलीकडे काही कृती होत नाही, ही खेदजनक गोष्ट आहे.

पाक आतंकवाद्यांचे पालनपोषण करतो आणि लादेन याला हुतात्मा म्हणतो !

पाकव्याप्त काश्मीर मोकळे करण्याची मागणी करून पाक ते मोकळे करणार नाही, तर भारताला सैनिकी कारवाई करूनच ते मोकळे करावे लागणार आहे !

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये भारताने पाक आणि इस्लामी देशांची संघटना यांना फटकारले !

अशा शाब्दिक फटकार्‍यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. त्याला समजेल अशाच भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !

लोणकढी थाप !

केंद्रात काँग्रेस सत्तेत असतांना तिने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी का प्रयत्न केले नाहीत !

(म्हणे) ‘काश्मीरच्या मुसलमानांसाठी एक मुसलमान म्हणून आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार !’ – तालिबान  

‘चीनमधील उघूर मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार आहे’, असे बोलण्याचे धारिष्ट्य तालिबानी आतंकवादी का दाखवत नाहीत ? यावरून त्यांचे बेगडी मुसलमानप्रेम आणि भारतद्वेष दिसून येतो !