|
पाकव्याप्त काश्मीर मोकळे करण्याची मागणी करून पाक ते मोकळे करणार नाही, तर भारताला सैनिकी कारवाई करूनच ते मोकळे करावे लागणार आहे ! – संपादक
नवी देहली – आतंकवाद्यांना प्रोत्साहन आणि साहाय्य करण्याचा पाकिस्तानचा इतिहास असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना ठाऊक आहे. विशेष म्हणजे याचा पाकिस्तानच्या धोरणातही समावेश आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठाचा वापर नेहमीच भारताविरोधात खोटे बोलण्यासाठी आणि जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केला आहे. ही पाकिस्तानची पहिलीच वेळ नाही. आतंकवादी पाकिस्तानात मुक्तपणे फिरत असून ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानने आश्रय दिला होता. पाकिस्तान ओसामा बिन लादेन याचा त्याच्या देशात ‘हुतात्मा’ म्हणून उल्लेख करतो. पाकिस्तानात आतंकवादी बेछूटपणे वावरतात; मात्र सामान्य नागरिक विशेषतः अल्पसंख्यांकांची परिस्थिती बिकट आहे, अशा शब्दांत भारताने पाकला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये फटकारले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करतांना काश्मीरविषयीचे सूत्र उपस्थित करतांना ‘दक्षिण आशियातील कायमस्वरूपी शांतता जम्मू-काश्मीर वादाच्या निराकरणावर अवलंबून आहे’, असे म्हटले होते. त्याला भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील सचिव स्नेहा दुबे यांनी वरील शब्दांत प्रत्युत्तर दिले. ‘अवैधरित्या हस्तगत केलेला पाकव्याप्त काश्मीरचा भाग तात्काळ रिकामा करा’, असेही दुबे यांनी पाकला ठणकावून सांगितले. सामाजिक माध्यमांतून भारताच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे.
We heard the leader of Pakistan trying to justify act of terror, such defence of terrorism is unacceptable: Sneha Dubey, First Secretary at UNGA @MEAIndia pic.twitter.com/jAtCiFPUZp
— The Times Of India (@timesofindia) September 25, 2021
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करतांना इम्रान खान यांनी भारतावर काही गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ च्या आक्रमणानंतर जगभरातील उजव्या विचारसरणीने मुसलमानांवर आक्रमणे करण्यास चालू केले. (जर अशी आक्रमणे होत असतील, तर ती का होत आहेत, याचा विचार इम्रान खान का करत नाहीत ? – संपादक) याचा सर्वांत मोठा प्रभाव भारत देशात पहायला मिळाला. भारतामध्ये रा.स्व. संघ आणि भाजप मुसलमानांना लक्ष्य करत आहेत. (पाकमध्ये हिंदूंवर गेल्या ७४ वर्षांत कोणत्या विचारसरणीचे लोक आक्रमण करून त्यांचा वंशसंहार करत आहेत, हे इम्रान खान कधी सांगणार ? पाकमध्ये हिंदूंनी कधी मुसलमानांवर आक्रमण केल्याची घटना घडलेली नसतांना हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर आक्रमणे का होत आहेत ? हिंदूंच्या मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि बलपूर्वक विवाह का लावून दिले जात आहेत, हे इम्रान खान कधी सांगणार ? – संपादक) मुसलमानांमध्ये भेदभाव केला जात आहे. भारताने एकतर्फी पावले उचलत काश्मीरवर बलपूर्वक नियंत्रण ठेवले आहे. (‘चोर तो चोर वर शिरजोर’ या वृत्तीचे पाकचे पंतप्रधान ! – संपादक)