काश्मीरची स्थिती पालटण्यासाठी बिहारींकडे काश्मीरचे दायित्व द्या ! – माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची मागणी

माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी

पाटलीपुत्र (बिहार) – काश्मीरमध्ये वारंवार होणार्‍या गरीब बिहारी लोकांच्या हत्येमुळे मन व्यथित झाले आहे. जर परिस्थितीत पालट होत नसेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरचे दायित्व बिहारींकडे द्या, १५ दिवसांत आम्ही परिस्थिती पालटून दाखवू, असे विधान बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी ट्वीट करून केले.

गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये परप्रांतियांवर आक्रमणे होत असून बिहारच्या २ कामगारांना ठार मारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मांझी यांनी हे विधान केले.