वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे, हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे. विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याविषयी हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. वैचारिक आतंकवादाची उदाहरणे

१. ‘समान नागरी कायदा अस्तित्वात यायला हवा’, असे आम्ही म्हणतो; कारण त्याविषयी राज्यघटनेत लिहिलेले आहे. तेव्हा विरोधक म्हणतात की, नाही. जरी ते राज्यघटनेत लिहिलेले असले, तरी तो भावनेचा आणि अल्पसंख्यांकांना सांभाळून घेण्याचा प्रश्न आहे.

२. जेव्हा आम्ही म्हणतो की, ‘लव्ह जिहाद’ चुकीचा आहे. तो आमच्या (हिंदु) संस्कृतीचे जतन आणि भावना यांचा प्रश्न आहे. तेव्हा ते पुन्हा म्हणतात की, तुमची मागणी चुकीची आहे; कारण ती राज्यघटनेच्या विरोधात आहे.

३. जेव्हा आम्ही म्हणत होतो की, राज्यघटनेचे कलम ३७० रहित व्हायला पाहिजे होते; कारण ते देशाच्या अस्मितेसाठी घातक होते. तेव्हा ते म्हणत होते की, नाही. कलम ३७० म्हणजे सर्वधर्मसमभाव आणि काश्मिरी जनतेच्या संस्कृतीचा प्रश्नही आहे. (कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीर विशेष स्वायत्तता असलेले राज्य होते, तसेच यामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना विसर्जित करण्याचाही अधिकार नव्हता. हे कलम केंद्रशासनाने आता रहित केले आहे. – संकलक)

(क्रमश: पुढच्या रविवारी)

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (मे २०२१)