(म्हणे) ‘काश्मीरच्या मुसलमानांसाठी एक मुसलमान म्हणून आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार !’ – तालिबान  

  • ‘चीनमधील उघूर मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार आहे’, असे बोलण्याचे धारिष्ट्य तालिबानी आतंकवादी का दाखवत नाहीत ? यावरून त्यांचे बेगडी मुसलमानप्रेम आणि भारतद्वेष दिसून येतो !- संपादक

  • ‘काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाक यांच्यातील आहे. त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही’, असे म्हणणारा तालिबान आज अगदी उलट विधान करतो. यावरून त्याच्यावर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, हे स्पष्ट होते !- संपादक
तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन

लंडन (ब्रिटन) – एक ‘मुसलमान’ म्हणून भारताच्या काश्मीरमध्ये अथवा कोणत्याही देशातील मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे विधान तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. ‘आम्ही आवाज उठवू आणि संबंधित देशांना सांगू की, मुसलमान तुमचे नागरिक आहेत. कायद्यानुसार ते समान आहेत’, असेही तो म्हणाला. ‘कोणत्याही देशाच्या विरोधात सशस्त्र अभियान राबवणे आमच्या धोरणाचा भाग नाही’, असेही त्याने सांगितले. (याला लोणकढी थाप म्हणतात ! तालिबानच्या या विधानावर जगातील एकतरी देश विश्वास ठेवील का ? – संपादक)