अमेरिकेला सुनवा !

अमेरिकेतील भारतीयांनी भारताची बाजू उचलून धरली पाहिजे; कमीतकमी भारताचा अवमान किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होणार्‍या गोष्टींना सामाजिक माध्यमांवर निषेधाचा सूर लावायला हवा. अमेरिका ही भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी आहे. आक्रमकपणे तिला प्रत्युत्तर देत राहिले, तरच ती ताळ्यावर येईल !

शी जिनपिंग यांना लोकशाही ठाऊक नाही ! – जो बायडेन यांनी फटकारले

एक लोकशाहीप्रधान देशाचे नेतृत्व कसे करायचे याचे गुण जिनपिंग यांच्यात नाहीत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिनपिंग यांना फटकारले.

अमेरिकेची धोरणे !

ट्रम्प यांचे काही निर्णय बायडेन यांना चुकीचे वाटणे स्वाभाविक असले, तरी एकूण चीनविरोधी नीती अयोग्यच होती आणि ती पालटायला हवी, असे ते कदापि म्हणू शकणार नाहीत. ते अमेरिकेच्या हिताचे होणार नाही.

पाकच्या सिंध प्रांतातील अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांचे रक्षण करा ! – अमेरिकेतील सिंधी संघटनेची मागणी

पाकमधील सिंधी संघटना बहुसंख्य हिंदूंचा देश असणार्‍या भारताकडे साहाय्य मागत नाही, तर अमेरिकेकडे साहाय्य मागते ! यावरून ‘भारत पीडित हिंदूंसाठी काहीही करणार नाही, हे जगभरातील हिंदूंच्याही लक्षात आले आहे’, असे समजायचे का ?

चीनकडून शेजार्‍यांना धमकावणे आणि दहशत पसरवणे यांमुळे आम्ही चिंतेत ! – अमेरिका

अमेरिकेने केवळ अशी वक्तव्ये करून गप्प न बसता स्वतः चीनवर कारवाई करणे अपेक्षित आहे !