पुतीन हत्यारे असल्याने त्यांना मूल्य चुकवावेच लागेल ! – जो बायडेन

बायडेन यांच्या वक्तव्यानंतर रशियाने अमेरिकेतील राजदूत बोलावले माघारी !

डावीकडून व्लादिमीर पुतीन, जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – नोव्हेंबर २०२० च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केलेल्या हस्तक्षेपाची किंमत त्यांना मोजावी लागेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे.  यानंतर रशियाने त्याच्या अमेरिकेतील राजदूताला चर्चा करण्यासाठी पुन्हा मॉस्कोला बोलावले आहे. ‘एबीसी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत बायडेन यांना ‘रशियातील विरोधी पक्षनेते अलेक्सी नॅव्हेली आणि अन्य प्रतिस्पर्ध्यांना विष दिल्याच्या आरोपाखाली पुतीन हे दोषी आहेत का?’ असा प्रश्‍न विचारला असता बायडेन म्हणाले, ‘हो मी मानतो की ते दोषी आहेत. ते खुनी आहेत. त्यांना याची किंमत मोजावीच लागेल.’