बगदादमध्ये २ आत्मघाती आक्रमणांत २० जणांचा मृत्यू, तर ४० जण घायाळ  

इराकची राजधानी बगदादच्या कमर्शियल सेंटरमध्ये झालेल्या २ आत्मघाती आक्रमणांमध्ये २० जणांचा मृत्यू, तर ४० जण घायाळ झाले.

पाकने केलेल्या ‘शाहीन-३’ क्षेपणास्त्राच्या परीक्षणामध्ये पाकचेच नागरिक घायाळ !  

बलुचिस्तानमधील डेरा गाझी खान येथे करण्यात आले, तेव्हा डेरा बुग्ती येथील रहिवासी भागात हे क्षेपणास्त्र पडल्याने अनेक घरांची पडझड झाली आणि अनेक नागरिक घायाळ झाले.

राष्ट्राध्यक्ष झाल्यावर बायडेन यांनी ‘पॅरिस करारा’मध्ये पुन्हा सहभागी होण्याचा घेतला निर्णय !

अमेरिका आता इस्लामी आणि आफ्रिकी देशांतील मुसलमानांना प्रवेश देणार

काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे ३ आतंकवादी ठार, तर ४ सैनिक घायाळ

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !

अमेरिकेतील सत्तापरिवर्तन आणि भारत !

अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन शपथ घेत आहेत. यापुढे जागतिक महासत्तेची सर्व सूत्रे बायडेन यांच्या हाती असतील. त्याचबरोबर मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या उपराष्ट्रपती पदावर आरूढ झाल्या आहेत, म्हणजे त्या जागतिक महासत्तेच्या क्रमांक दोनच्या सर्वाधिक शक्तीशाली नेत्या असतील.

खलिस्तानी आतंकवादी संघटनांशी संबंध असलेल्या ‘खालसा एड’ या संघटनेला शांततेचे नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस !

भारतात ‘खालसा एड’ या संघटनेवर खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचा आरोप आहे.

भारताने भुतान आणि मालदीव यांना भेट स्वरूपात कोरोनावरील लसींचे अडीच लाख डोस पाठवले !

भारत नेहमीच शेजारी देशांना साहाय्य करत आला आहे; मात्र पाक आणि नेपाळ यांसारखे शेजारी देश भारताला पाण्यात पहात असतात. त्यांच्यासमवेत गांधीगिरी करण्याऐवजी त्यांना धडा शिकवण्याचाही प्रयत्न भारताने केला पाहिजे !

कंबोडियाकडूनही भारताकडे कोरोनावरील लसींची मागणी

भारतात कोरोनावरील स्वदेशी लस निर्माण केल्यावर १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आता जगातील अनेक देशांनी भारताकडे या लसींची मागणी केली आहे.

गांजाचा अंश असणार्‍या औषधांद्वारे कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवता येतील ! – कॅनडातील संशोधकांचा दावा

कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठाने गांजाचा वापर करून कोरोनाचा सर्वाधिक धोका असणार्‍या वयोगटातील आणि गंभीर आजार असणार्‍यांना वाचवता येऊ शकते, असा दावा केला आहे.

पाकिस्तानात ‘स्वतंत्र सिंधु देशा’साठी मोर्चा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील प्रमुख नेत्यांचे फलक ! सध्या पाकमधील राजकीय स्थिती पहाता भविष्यात पाकचे ५ – ६ तुकडे झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! भारताने अशी मागणी करणार्‍यांना सर्व प्रकारचे साहाय्य करून पाकचे तुकडे होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !